Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात पूल मृत्यूकांड: दोन वर्षांपूर्वीच्या पत्रानं उघड केला जीवघेणा निष्काळजीपणा!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Morbi Bridge Collapse

मुक्तपीठ टीम

गुजरातमध्ये १३५ बळी घेणारे मोरबी पूल मृत्यकांड हा अचानक घडलेला अपघात असल्याचा दावा अनेकजण करतात. काही माध्यमंही तसं मांडतात. पण हा पूल अचानक कोसळलेला नाही. दोन वर्षांपूर्वी एका पत्रात वापरलेला तात्पुरती दुरुस्ती हा शब्द धोका उघड करणारा होता. पण बेजबाबदार अधिकारी जागे झाले नाहीत. पुलाचे कायमस्वरुपी कंत्राट कामही दिले ते त्याच घड्याळ कंपनीला. आणि त्याचा फटका शेकडो कुटुंबांना बसला!

जानेवरी २०२० चे धक्कादायक पत्र!

  • पुलाची देखभाल आणि दुरुस्ती पाहणाऱ्या ओरेवा कंपनीचे जानेवारी २०२० चे पत्र समोर आले आहे.
  • हे पत्र मोरबीच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. तात्पुरती दुरुस्ती करून पूल खुला करू, असे त्यात म्हटले आहे.
  • या पत्रानंतरही अधिकारी गप्प बसल्याने एवढी मोठी दुर्घटना घडली.

कंपनी आणि प्रशासनात कंत्राटावरून खडाजंगी…

  • जानेवारी २०२०च्या पत्रात अनेक बाबी समोर आल्या आहेत.
  • पुलाच्या कंत्राटावरून कंपनी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात भांडण सुरू होते.
  • ओरेवा ग्रुपला पुलाच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी कंत्राट हवे होते, असे या पत्रातून स्पष्ट झाले आहे.
  • कायमस्वरूपी कंत्राट मिळेपर्यंत पुलाची तात्पुरती डागडुजी सुरूच ठेवणार असल्याचे ओरेवाने सांगितले होते.
  • ओरेवा फर्म पुलाच्या दुरुस्तीसाठी साहित्य मागवणार नाही आणि त्यांची मागणी पूर्ण झाल्यानंतरच ते काम पूर्ण करतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

ओरेवा ग्रुपला मार्चमध्ये कायमस्वरूपी कंत्राट मिळाले!

  • ओरेवा ग्रुपला जिल्हा प्रशासनाकडून कायमस्वरूपी निविदा देण्यात आली.
  • जानेवारी २०२०मध्ये जारी केलेल्या या पत्रानंतरही पुलाच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी ओरेवा ग्रुपसोबत १५ वर्षांसाठी करार करण्यात आला.
  • मार्च २०२२ मध्ये मोरबी महानगरपालिका आणि अजंता ओरेवा कंपनी यांच्यात करार झाला.
  • हा करार २०३७ पर्यंतचा आहे.
  • पूल दुर्घटनेनंतर मोरबी नगरपालिकेने जबाबदारी पूर्ण झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
  • पालिका अधिकारी संदीप सिंह यांनी सांगितले की ओरेवा ग्रुपने कराराच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे.
  • त्यांनी पालिकेला न कळवता पाच महिन्यांत पूल खुला केला होता.
  • या पुलाबद्दल त्यांच्याकडून कोणतेही प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

खरगे यांची प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची करण्याची मागणी…

  • काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोरबी पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
  • मोरबी पूल दुर्घटनेत १३५ जणांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करावी, असे ट्विट खरगे यांनी केले.
  • पालिका, ओरवा फर्म आणि दोषी अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे.
  • या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कालबद्ध न्यायालयीन चौकशी हा एकमेव पर्याय आहे.

Tags: GujaratGujarat Bridge CollapseMorbi Bridge Collapsedगुजरातगुजरात पूल मृत्यूकांड
Previous Post

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये १८० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

गडकरींच्या पत्राला टाटा समुहाचं उत्तर: “विदर्भात गुंतवणुकीसाठी तयार!”

Next Post
Nagpur MP Nitin Gadkari

गडकरींच्या पत्राला टाटा समुहाचं उत्तर: "विदर्भात गुंतवणुकीसाठी तयार!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!