Tag: गुड न्यूज

बिनधास्त करा ‘आधार’चा वापर…पण घ्या ‘अशी’ खबरदारी!

मुक्तपीठ टीम अनेकविध लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आपण स्वेच्छेने आवडीनुसार आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधारच्या वापराबाबतही बाळगा. आधार म्हणजे नागरीकांचे डिजिटल ओळखपत्रच आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या ओळखीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड हा देशभरात वापरला जाणारा एक महत्वाचा स्रोत आहे. देशातले नागरिक आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक किंवा ऑफलाइन वापर करून आपल्या ओळखीशी संबंधित तपशीलाची पडताळणी आणि खात्री करू शकतात. आपण जरी कोणत्याही विश्वासार्ह संस्थेला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज देणार असू तर अशावेळी देखील तशाच पद्धतीची खबरदारी घ्यायला हवी जशी आपण, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, मतदार ओळखपत्र तसेच पॅन कार्डसारखे दस्तऐवज देताना बाळगतो. जर का एखाद्या नागरिकाला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज द्यायचा नसेल तर अशा परिस्थितीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) व्हर्जुअल आयडेन्टिटीफायर अशी आभासी पद्धतीने ओळख पटवून देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष आधार क्रमांक देण्याऐवजी अशा तऱ्हेच्या पर्यायी पद्धतीने आपली ओळख पटवून देण्यासाठी संबंधीताला अधिकृत संकेतस्थळाला किंवा माय आधार पोर्टलला (myaadhaar portal) भेट द्यावी लागेल. यूआयडीएआयने आधारच्या सुरक्षेसाठी आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. जर का एखादा नागरिक विशिष्ट काळात आधारचा वापर करणार नसतील तर अशावेळी ते आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगचा वापर करून आपल्या आधारची सुरक्षितता निश्चित करू शकतात. नागरिकांनी आपल्याला आलेले आधारचे पत्र / पीव्हीसी कार्ड किंवा त्याची प्रत कुठेही ठेवू नये / गहाळ करू नये असे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. नागरिकांनी सर्वांसाठी खुल्या असलेल्या कोणत्याही व्यासपीठावर विशेषतः समाजमाध्यमे आणि सर्वांसाठी खुल्या माध्यमांवर आपले आधार कार्ड कुणाशीही सामायिक करू नये असा सल्लाही यूआयडीएआयने दिला आहे. जर आपल्याला आधारचा अनधिकृत वापर होत असल्याचा संशय असेल, किंवा आधारशी ...

Read more

देशभरात दीड लाख आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे झाली कार्यरत

मुक्तपीठ टीम भारताच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या मजबुतीचे दर्शन घडवत साध्य केलेल्या एका लक्षणीय कामगिरींतर्गत भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला असून, ...

Read more

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ५३ वरिष्ठ सहाय्यकांसाठी भरती, २० जानेवारीपर्यंत करा अर्ज…

मुक्तपीठ टीम भारतीय विमानतळ प्राधिकरणाने उत्तर प्रदेशातील गैर-कार्यकारी संवर्ग पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वित्त आणि इलेक्ट्रॉनिक्समधील वरिष्ठ सहाय्यकांच्या ...

Read more

मेथीच्या बियांचे अनेक फायदे! मधुमेहावरही प्रभावी!! नक्की वाचा…

मुक्तपीठ टीम मेथीच्या दाण्यांचा वापर अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. किचनमध्ये असलेले मेथीचे दाणे आरोग्यासाठी आणि चव दोन्हीसाठी खूप ...

Read more

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक करार: व्यावसायिक, योग शिक्षक, विद्यार्थ्यांना कसा होणार लाभ?

मुक्तपीठ टीम भारताने यावर्षी दोन व्यापार करार कार्यान्वित करण्याचा अनोखा गौरव प्राप्त केला आहे. या  वर्षात १ मे रोजी भारत- ...

Read more

बिगबॉस सांगू इच्छितो… हा आवाज नक्की कोणाचा?

मुक्तपीठ टीम बिगबॉसचा फक्त भारतातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात चाहतावर्ग आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे बिगबॉस न चुकता ...

Read more

भारतीय लष्कराने प्रथमच उभारले 3D मुद्रित दुमजली घर

मुक्तपीठ टीम भारतीय लष्कराने २८ डिसेंबर २०२२ रोजी अहमदाबाद छावणी येथे सैनिकांसाठी आपल्या पहिल्या 3D मुद्रित निवासी घराचे उद्घाटन केले. ...

Read more

सीआरपीएफमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलच्या १४५८ पदांसाठी मेगा भरती

मुक्तपीठ टीम केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफने सहाय्यक उपनिरीक्षक च्या १४३ पद आणि हेड कॉन्स्टेबलच्या १३१५ पद अशा एकूण ...

Read more

महाराष्ट्रातील तीन साहित्य‍िकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठीत ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.             येथील कमानी ...

Read more

RBI दक्ष : ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेची नवी यंत्रणा

मुक्तपीठ टीम ऑनलाइन फसवणुकीमध्ये ऑनलाइन घोटाळे, स्पॅम, एखाद्या स्कॅमरने तुमच्या माहितीशिवाय तुमच्या खात्यातून ऑनलाइन उत्पादने खरेदी करणे, ओळख स्पूफिंग, स्कॅम ...

Read more
Page 3 of 12 1 2 3 4 12

ताज्या बातम्या

error: Content is protected !!