Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लखीमपूर शेतकरी हत्याकांड: केंद्रीय राज्यमंत्रीपुत्र आशिष मिश्राचा जामीन रद्द

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या जामीन निकालातील मुद्द्यांना आक्षेप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Lakhimpur Khairi

मुक्तपीठ टीम

लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला होता. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडात चिरडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.आशिष मिश्राला एक आठवड्यात शरण यावं लागेल. त्याचवेळी त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात पुन्हा जामीनासाठी अर्ज करता येईल,

 

सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सोमवारी निकाल दिला आहे.
४ एप्रिल रोजी सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.

सुनावणीदरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या एफआयआरमधील “असंबद्ध” तपशिलांवर आणि पोस्टमार्टम अहवालावर अवलंबून असलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला.

जामीन रद्द करण्यासाठीचा युक्तिवाद

  • याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी युक्तिवाद केला.
  • उच्च न्यायालयाने एसआयटीच्या अहवालाकडे तसेच आरोपपत्राकडे दुर्लक्ष केले.
  • आरोप गंभीर असून साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्यांनी जामीन रद्द करण्याची मागणी केली होती.

 

जामीन कायम ठेवण्यासाठीचा युक्तिवाद

दुसरीकडे, आशिष मिश्रा यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील रणजित कुमार यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा बचाव करताना सांगितले की, त्यावेळी आशिष हे घटनास्थळी उपस्थित नव्हते.

 

लखीमपुरात काय घडलं होतं?

  • गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लखीमपूर खेरी जिल्ह्याच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी चार शेतकऱ्यांचा एसयूव्हीखाली चिरडून मृत्यू झाला होता.
  • या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा आरोपी आहे.
  • त्याचे वडिल यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून कारागृहात पाठवले.

 

हे ही वाचा :

लखीमपूर शेतकरी हत्याकांड विसरला असाल तर खालील लिंक क्लिक करून समजून घ्या:

शेतकऱ्यांना चिरडणारी जनरल डायरची अवलाद!

लखीमपूर शेतकरी हत्याकांड: आशिष मिश्राविरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र, वडिल आजही मंत्रिमंडळात थाटात!

लखीमपूर शेतकरी हत्याकांड तपास: सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले निवृत्त न्यायाधीश देखरेख करणार

लखीमपूर शेतकरी हत्याकांडात मंत्रीपुत्र आशिष मिश्रा, मित्राच्या शस्त्रांमधून गोळीबार! पत्रकारही गाडीखालीच चिरडले गेले!

लखीमपूरप्रकरणी उप्र सरकारवर सर्वोच्च न्यायालय नाराज! एका आरोपीच्या फायद्यासाठी प्रयत्न!!

लखीमपूर शेतकरी हत्याकांड: मंत्रीपुत्राला अटक करणाऱ्या डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांची बदली

शेतकरी हत्याकांडाचा लाइव्ह व्हिडीओ…शेतकऱ्यांना कसं चिरडलं गाडीखाली…प्रियांका गांधींनी केला व्हिडीओ शेअर!

शेतकरी हत्याकांड: “मी फक्त मंत्री-खासदार नाही…” धमकावणारे अजय मिश्रा मग आहेत तरी कोण?


Tags: ashish mishralakhimpur kheriSupreme CourtUttar Pradeshआशिष मिश्राउत्तर प्रदेशलखीमपूर शेतकरी हत्याकांडसर्वोच्च न्यायालय
Previous Post

सुमधूर…गारेगार…ताडगोळे!

Next Post

मराठा , कुणबी समाजांच्या प्रगतीला गती देऊ शकणाऱ्या ‘सारथी’च्या मार्गात अडथळेच का फार?

Next Post
Dr ganesh golekar on maratha kunbi sarathi problems

मराठा , कुणबी समाजांच्या प्रगतीला गती देऊ शकणाऱ्या 'सारथी'च्या मार्गात अडथळेच का फार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!