Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लखीमपूर शेतकरी हत्याकांड तपास: सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले निवृत्त न्यायाधीश देखरेख करणार

उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीचीही न्यायालयाकडून पुनर्रचना

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
lakhimpur

मुक्तपीठ टिम

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार जैन यांच्याकडे तपासावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपविली आहे. यासोबतच न्यायालयाने एसआयटीची पुनर्रचना करण्याचे आदेशही दिले आहेत. या टीममध्ये तीन वरिष्ठ आयपीएएस अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. यामध्ये पद्मजा चौहान, दीपेंद्र सिंह, एसबी सिरोडकर यांच्या नावांचा समावेश आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालय करणार आहे.

 

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालय तपासावर देखरेख ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करू शकते. सर्वोच्च न्यायालय योग्य वाटेल त्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊ शकते. त्याप्रमाणे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती राकेश कुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

त्याच वेळी, लखीमपूर हिंसाचाराच्या तपासात गुंतलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांच्या एसआयटीमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारपर्यंत उत्तर प्रदेशच्या आयपीएस अधिकाऱ्यांची यादी सादर करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. आयपीएस हा उत्तरप्रदेश कॅडरचा असावा. यापूर्वी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. हिंसाचारात सहभागी असलेल्या एका विशिष्ट आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे (केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्रा याचा उल्लेख न करता) सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही एफआयआरची स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

 

समजून घ्या लखिमपूर शेतकरी हत्याकांड आहे तरी काय?

  • संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यासाठी दिल्लीत दहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत होते.
  • आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सभा स्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते.
  • केंद्रीय गृहराज्यमंत्री तेनी यांचा मुलगा आशिष मिश्र तेनी याने व त्याच्या गुंडांनी शेतकऱ्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले.

Tags: lakhimpur kheriSITSupreme CourtUattar Pradesh Govtउत्तर प्रदेश सरकारन्यायाधीश राकेश कुमार जैनलखीमपूर खेरी हिंसाचारसर्वोच्च न्यायालय
Previous Post

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता…हवामान खात्याचा इशारा!

Next Post

अरेरे…एक कोटीची उधळपट्टी! तरीही मुंबई मनपा भाजपा सदस्याला हटवण्यात अपयशी!

Next Post
Bhalchandra

अरेरे...एक कोटीची उधळपट्टी! तरीही मुंबई मनपा भाजपा सदस्याला हटवण्यात अपयशी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!