मुक्तपीठ टीम
लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला होता. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडात चिरडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.आशिष मिश्राला एक आठवड्यात शरण यावं लागेल. त्याचवेळी त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात पुन्हा जामीनासाठी अर्ज करता येईल,
सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सोमवारी निकाल दिला आहे.
४ एप्रिल रोजी सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.
सुनावणीदरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या एफआयआरमधील “असंबद्ध” तपशिलांवर आणि पोस्टमार्टम अहवालावर अवलंबून असलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला.
जामीन रद्द करण्यासाठीचा युक्तिवाद
- याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी युक्तिवाद केला.
- उच्च न्यायालयाने एसआयटीच्या अहवालाकडे तसेच आरोपपत्राकडे दुर्लक्ष केले.
- आरोप गंभीर असून साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्यांनी जामीन रद्द करण्याची मागणी केली होती.
जामीन कायम ठेवण्यासाठीचा युक्तिवाद
दुसरीकडे, आशिष मिश्रा यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील रणजित कुमार यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा बचाव करताना सांगितले की, त्यावेळी आशिष हे घटनास्थळी उपस्थित नव्हते.
लखीमपुरात काय घडलं होतं?
- गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लखीमपूर खेरी जिल्ह्याच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी चार शेतकऱ्यांचा एसयूव्हीखाली चिरडून मृत्यू झाला होता.
- या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा आरोपी आहे.
- त्याचे वडिल यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून कारागृहात पाठवले.
हे ही वाचा :
लखीमपूर शेतकरी हत्याकांड विसरला असाल तर खालील लिंक क्लिक करून समजून घ्या:
शेतकऱ्यांना चिरडणारी जनरल डायरची अवलाद!
लखीमपूर शेतकरी हत्याकांड: आशिष मिश्राविरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र, वडिल आजही मंत्रिमंडळात थाटात!
लखीमपूर शेतकरी हत्याकांड तपास: सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले निवृत्त न्यायाधीश देखरेख करणार
लखीमपूरप्रकरणी उप्र सरकारवर सर्वोच्च न्यायालय नाराज! एका आरोपीच्या फायद्यासाठी प्रयत्न!!
लखीमपूर शेतकरी हत्याकांड: मंत्रीपुत्राला अटक करणाऱ्या डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांची बदली
शेतकरी हत्याकांड: “मी फक्त मंत्री-खासदार नाही…” धमकावणारे अजय मिश्रा मग आहेत तरी कोण?