Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कॉर्पोरेट कंपन्यांकडून बनवा तुरुंग, बदल्यात द्या कर सवलती! सर्वोच्च न्यायालयाची सूचना!!

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Supreme Court

मुक्तपीठ टीम

देशातील कारागृहात कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. कारागृहांमधील सुविधांची तीव्र कमतरता आणि कैद्यांची वाढती संख्या याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खासगी कारागृहांची सूचना केली आहे.

न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या खंडपीठाने दिलेल्या माहितीनुसार, “मोठ्या संख्येने कॉर्पोरेट कंपन्यांना याचा भाग बनवता येईल. न्यायमूर्ती जोसेफ यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले की, त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून तुम्ही त्यांना तुरुंग बांधण्यास सांगू शकता.”

कॉर्पोरेट कंपन्यांकडून तुरुंग बांधा आणि त्या बदल्यात त्यांना कर सूट द्या…

  • सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना तुरुंगातून रुग्णालयात हलवण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीकडे लक्ष वेधले आणि कंपन्यांना तुरुंग बांधण्याची आणि त्या बदल्यात करात सूट देण्याची सूचना केली.
  • यापूर्वी, खंडपीठाने तळोजा कारागृह अधीक्षकांना कार्यकर्ता नवलखा यांना मुंबईच्या जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे आदेश दिले होते.

‘तुरूंगातील कैद्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे’- खंडपीठाची माहिती

  • आरोपी आणि दोषींना एकत्र ठेवू नये, असा नियम आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.
  • पण आमच्या तुरुंगात गर्दी झालेली आहे.
  • येथे राहणाऱ्या कैद्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.
  • आपण त्यांना अमानवी जीवन देऊ शकत नाही. यापेक्षा प्राणीही चांगले ठेवले जातात, असे खंडपीठाने सांगितले.

खंडपीठाने म्हटले की, “तुरुंगातील सुविधा ही कोणत्याही सरकारची सर्वात कमी प्राथमिकता असते. त्यांना रुग्णालये आणि शाळा बांधायच्या आहेत. युरोपमध्ये वैयक्तिक जबाबदारीची संकल्पना आहे. येथे तुम्ही त्यात कॉर्पोरेट समाविष्ट करू शकता. या कंपन्या तुमच्यासाठी तुरुंग बनवतील. त्यामुळे सरकारवरही भार पडणार नाही आणि कंपन्या या कामात झालेल्या खर्चावर आयकर लाभही घेऊ शकतात, असे खंडपीठाने मेहता यांना सांगितले.”


Tags: Corporate companyJail FacilitiesmuktpeethSupreme CourtTax Exemptionकर सवलतकायदा पोलीसकॉर्पोरेट कंपनीघडलं-बिघडलंतुरूंग सुविधामुक्तपीठसर्वोच्च न्यायालय
Previous Post

रेपो रेट वाढल्यानं गृह कर्जचा हप्ता महागणार! वाचा पुन्हा खिसा कसा कापला जाणार…

Next Post

प्रत्येक महिलेला प्रजननाची स्वायत्तता आणि गर्भपाताचा अधिकार! गर्भपात निकालात आणखीही बरंच काही…

Next Post
Abortion Rights

प्रत्येक महिलेला प्रजननाची स्वायत्तता आणि गर्भपाताचा अधिकार! गर्भपात निकालात आणखीही बरंच काही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!