Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रत्येक महिलेला प्रजननाची स्वायत्तता आणि गर्भपाताचा अधिकार! गर्भपात निकालात आणखीही बरंच काही…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Abortion Rights

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात अधिकाराविषयी ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वैवाहिक असो की नसो, प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार आहे, असं स्पष्ट केलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानुसार अविवाहित महिलांना गर्भपाताच्या अधिकारापासून दूर ठेवणे हे असंवैधानिक आहे. महिलांना प्रजनन स्वायत्तता आणि गर्भपाताचा अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं वैद्यकीय क्षेत्रातही स्वागत केलं जात आहे. तसेच प्रथमच मर्यादित स्वरुपात का असेना वैवाहिक बलात्काराच्या संकल्पनेला न्यायालयानं स्वीकारलं आहे.

हा निकाल देशातील लवकर गर्भधारणेच्या समस्येला तोंड देण्यासही मदत करेल. महिलांनी सुरक्षित गर्भपात सेवा मिळू शकत नसल्याने तसेच काही गर्भपातांना कायदेशीर मान्यता नसल्यामुळे असुरक्षित गर्भपात ही एक गंभीर समस्या आहे. या निकालामुळे असुरक्षित गर्भपात लक्षणीयरीत्या कमी होतील.

गर्भपाताचा अधिकार देताना सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

  • न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती जेबी पारदीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले की, असे करणे घटनेच्या कलम १४चे उल्लंघन आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, महिलेची वैवाहिक स्थिती काहीही असली, मग त्या वैवाहिक असो की नसो, तरी देखील प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार आहे.
  • मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यातील तरतुदींचा अर्थ लावताना न्यायालयाने हा निर्णय दिला.

असुरक्षित गर्भपाताची संख्या सुरक्षित गर्भपातापेक्षा जास्त!

  • देशातील सुरक्षित गर्भपाताच्या संख्येपेक्षा असुरक्षित गर्भपातांची संख्या लक्षणीय आहे.
  • सन २०२०च्या नॅशनल हेल्थ मिशनच्या वार्षिक अहवालानुसार, एकूण मातामृत्यूंपैकी आठ टक्के असुरक्षित गर्भपाताचा वाटा आहे.
  • जिवंत राहणाऱ्या महिलांना दीर्घकाळ अशक्तपणा, संसर्ग आणि वंध्यत्व यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
  • सन २०२०च्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्टनुसार, असुरक्षित गर्भपात हे भारतातील माता मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. दररोज सुमारे आठ महिलांचा मृत्यू होतो.

गर्भपात कायद्याची सविस्तर माहिती

  • भारतीय संसदेने १९७१ मध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा मंजूर केला होता आणि २०२१मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली.
  • त्याच्या निर्मितीच्या वेळी तो जगातील सर्वात प्रगतीशील कायद्यांपैकी एक होता.
  • त्याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे गर्भपातासाठी गर्भधारणेच्या कालावधीची कमाल मर्यादा २० आठवड्यांपर्यंत होती परंतु सुधारित कायदा २०२१ मध्ये हा कालावधी २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
  • टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यानुसार, केवळ बलात्कार पीडित, अल्पवयीन, गर्भधारणेदरम्यान ज्या महिलांची वैवाहिक स्थिती बदलली आहे, मानसिकदृष्ट्या आजारी स्त्रिया किंवा गर्भाची विकृती असलेल्या महिलांना २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे.
  • कायद्यानुसार, संमतीने झालेल्या गर्भधारणेचा केवळ २० आठवड्यांपर्यंत गर्भपात केला जाऊ शकतो.
  • यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, वैवाहिक स्थितीच्या आधारावर कायदा असे ‘कृत्रिम वर्गीकरण’ करू शकत नाही.
  • अवांछित गर्भधारणा होऊ नये म्हणून सरकारने प्रत्येकाला जननक्षमता आणि सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत जागरुकता असल्याची खात्री करावी.
  • प्रजननातील स्वायत्ततेचा शारीरिक स्वायत्ततेशी जवळचा संबंध आहे.

कोणत्या परिस्थितीत गर्भपात केला जाऊ शकतो?

  • जेव्हा डॉक्टरांची सहमती असते.
  • गर्भधारणा ठेवल्याने महिलेच्या जीवाला धोका निर्माण होतो किंवा त्यामुळे महिलेच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याला गंभीर इजा होऊ शकते.
  • जन्माला आलेल्या मुलाला शारीरिक किंवा मानसिक व्यंग असण्याची शक्यता असते.
  • विवाहित स्त्री किंवा तिच्या पतीने अवलंबलेली गर्भनिरोधक पद्धत अयशस्वी झाल्यास गर्भपात करता येतो.

आपल्याकडे कायद्यानुसार जरी वैवाहिक बलात्कार नसला तरी आता मात्र गर्भपात कायद्यांतर्गत महिलांना बळजबरीने गर्भधारणेपासून वाचवण्यासाठी वैवाहिक बलात्कार हा ‘बलात्कार’ मानला जावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.


Tags: Abortion rightsAbortion VerdictmuktpeethSupreme CourtUnmarried Women's Abortion RightsWomen's Reproductive Autonomyअविवाहित महिला गर्भपात अधिकारगर्भपात अधिकारगर्भपात निकालघडलं-बिघडलंमहिला प्रजनन स्वायत्ततामुक्तपीठसर्वोच्च न्यायलय
Previous Post

कॉर्पोरेट कंपन्यांकडून बनवा तुरुंग, बदल्यात द्या कर सवलती! सर्वोच्च न्यायालयाची सूचना!!

Next Post

भारतात पेट्रोल किंमत स्थिरच, पण इतर देशांनी किती कमी केले, किती वाढवले?

Next Post
petrol

भारतात पेट्रोल किंमत स्थिरच, पण इतर देशांनी किती कमी केले, किती वाढवले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!