Monday, May 26, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुधीर रसाळ, किशोर कदम, प्रणव सखदेव, किरण गुरव यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार

December 31, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, विशेष
0
साहित्य अकादमीने २०२१ या वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा केली असून यात प्रसिद्ध लेखक सुधीर रसाळ, कवी किशोर कदम (सौमित्र), युवा लेखक प्रणव सखदेव व बालसाहित्यकार किरण गुरव यांच्या साहित्यकृतींचा समावेश आहे.

मुक्तपीठ टीम

साहित्य अकादमीने २०२१ या वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा केली असून यात प्रसिद्ध लेखक सुधीर रसाळ, कवी किशोर कदम (सौमित्र), युवा लेखक प्रणव सखदेव व बालसाहित्यकार किरण गुरव यांच्या साहित्यकृतींचा समावेश आहे.

            

साहित्य अकादमीने २२ भाषातील पुरस्कार प्राप्त साहित्यकांची घोषणा केली. यात मराठीत युवा लेखक प्रणव सखदेव यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक्स’ या कादंबरीला युवा लेखक पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बालसाहित्यामध्ये किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ व तसेच त्यांना जुगाड या कादंबरीला सुद्धा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

            

ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. सुधीर रसाळ यांच्या मर्ढेकरांची कविता :

जीवनाचे अंतस्वरुप या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय हरीश्चंद्र थोरात यांच्या मूल्यभानाची सामग्री या समीक्षाग्रंथाला, बालाजी सुतार यांच्या ‘दोन शेतकऱ्यांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या लघुकथेची साहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रमेश वानखेडे यांच्या सायबर संस्कृती या निबंधाला तर प्रसिद्ध कवी किशोर कदम (सौमित्र) यांच्या बाऊल या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जी. के. ऐनापुरे यांच्या चिंचपोकळी यांच्या कथासंग्रहाला, ज्येष्ठ लेखक व माजी खासदार जनार्दन वाघमारे यांच्या ‘यमुनेचे पाणी‘ या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रुपये रोख व ताम्रपत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

 

प्रणव सखदेव  ; मराठीतील आघाडीचे तरुण लेखक                   

प्रणव सखदेव हे मराठी भाषेतील आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रसिध्द नाव आहे. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, ‘निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य‘ हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स‘, ‘९६ मेट्रोमॉल’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केले असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. अनुवाद-प्रकल्पासाठी त्यांना २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिके मिळाली असून त्यांनी इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद केला आहे. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणे व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसून येते.

‘काळेकरडे स्ट्रोक्स’ विषयी                          

काळेकरडे स्ट्रोक्स ही कादंबरी आजच्या जगण्याचे संदर्भ घेत तरुणाईचे एक वेगळे भावविश्व, त्यातील आवर्तने व आंदोलने उभी करते. या कादंबरीतील पात्रांच्या जीवनात चांगले साकारायला जावे आणि सतत फटकाऱ्यांनी चित्राचे सौंदर्य बिघडावे असे प्रसंग घडतात. तरुणाईचे विस्कटलेले भावविश्व प्रणव सखदेव यांनी या कादंबरीत उत्तमरित्या मांडले आहे. सहज आणि साधी  संवाद शैली,  व्यक्तीरेखा उभी करण्याची उत्तम हातोटी, ओघवते लेखन ही या कादंबरीची बलस्थाने आहेत.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी                

इंद्रजीत भालेराव, नागनाथ कोत्तापल्ले आणि भास्कर चंदनशिव या साहित्यिकांचा मराठी भाषेतील  साहित्य अकादमी युवा पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. ५० हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात पुस्काराचे वितरण करण्यात येईल.


Tags: kiran guravkishor kadampranav sakhdevSahitya Akademi 2021sudhir rasalकिरण गुरवकिशोर कदमप्रणव सखदेवसाहित्य अकादमी २०२१सुधीर रसाळ
Previous Post

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत ११ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

मुंबईत अंमली पदार्थांची होळी! सीमाशुल्क विभागाने तब्बल २७० किलो अंमली पदार्थ केले नष्ट!

Next Post
Mumbai Customs Zone 1 destroyed 269 Kg of Narcotics

मुंबईत अंमली पदार्थांची होळी! सीमाशुल्क विभागाने तब्बल २७० किलो अंमली पदार्थ केले नष्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra
featured

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

by Tulsidas Bhoite
May 24, 2025
0

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

April 8, 2025
जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!