Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“गुंतवणुकीसाठी अनेक गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती” – उद्योगमंत्री सुभाष देसाई

February 15, 2022
in घडलं-बिघडलं
0
Subhash Desai visit to serum institute

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र औद्योगिकरणात नेहमीचे अग्रेसर राज्य राहिले आहे. राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने राज्यात गुंतवणुक करण्यास अनेक गुंतवणुकदारांनी पसंती दर्शवली असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

            

पुणे येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत उद्योगमंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता, संचालक प्रशांत गिरबाणी उपस्थित होते.

           

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, महाराष्ट्राने कायम उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचे काम केले आहे. जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या राज्यामध्ये गुंतवणूक करत असून लॉकडाऊननंतर राज्य सरकारने योग्य नियोजन करुन राज्याचे अर्थचक्र सुरू राहावे यासाठी काळजी घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना कालावधीत अनेक कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. कोरोना काळातही शंभरपेक्षा अधिक औद्योगिक करार झाले आहे. या माध्यमातून राज्यात अनेकांना रोजगार मिळाला आहे.

            

उद्योग क्षेत्राला पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून सुभाष देसाई म्हणाले, राज्यात उद्योग क्षेत्रात सहजता यावी यासाठी एक खिडकी योजनेत महापरवाना देण्याची योजना सुरू केली आहे. यामुळे उद्योग उभारणीचा परवाना मिळणे सुलभ झाले आहे. उद्योग क्षेत्रात या निर्णयामुळे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात असलेल्या शासकीय अभियांत्रिकी तसेच इतर कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होत असल्याचेही ते म्हणाले.

            

राज्यात कोरोना संसर्गामुळे ऐकमेकांना भेटणे शक्य होत नव्हते. कोरोनाची पहिली लाट अत्यंत भयानक होती. मात्र सिरमच्या कोविशिल्ड लसीमुळे कोरोना संकटात मोठी साथ दिली आहे. उद्योग क्षेत्रात यामुळे आत्मविश्वास निर्माण केला आहे. डॉ. पुनावाला यांनी यासाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वूपर्ण असल्याचेही सुभाष देसाई म्हणाले.

            

डॉ. सायरस पूनावाला यांनी  सिरम इन्स्टिट्यूटचे जगभरातील अनेक देशांमध्ये काम सुरू असून कोविशिल्ड लशीच्या यशाबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. पुनावाला यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी उद्योग क्षेत्रातील विविध देशांचे प्रमुख उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते.


Previous Post

“जे मतदार भाजपाला मत देणार नाहीत त्यांच्यासाठी योगींनी हजारो बुलडोझर मागवलेत!”

Next Post

संजय राऊत आणि भाजपाचे साडेतीन…चर्चा जोरात! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात?

Next Post
Supriya Sule And Chandrakant patil

संजय राऊत आणि भाजपाचे साडेतीन...चर्चा जोरात! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!