अंजिक्य घोंगडे
शेतकऱ्यांसाठी योजना खूप पण होत काही नसतं, अशी खंत अनेकदा व्यक्त होते. पण ठरवलं तर अशक्य काही नसतं. नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी हे दाखवून दिलंय. त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा प्रशासनाने शेतमालाची विक्री सुलभ करण्यासाठी ग्राहक वर्दळीच्या जागा निवडली. ती म्हणजे थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराची. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्याच कार्यालयाच्या आवारात विनामूल्य व कायमस्वरूपी स्टॉल्स लावले आहेत.
नांदेडचे अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोटेशन तत्त्वावर शेतकरी व त्यांच्या गटांना जागा देण्यात येणार आहे. “प्रत्येक स्टॉल १०० चौरस फूट आहे आणि शेतकर्यांना त्यांचे उत्पादन प्रदर्शित करण्यासाठी व विक्री करण्यासाठी पुरेशी जागा देते. सर्व भाज्या आणि फळे विकले गेल्याने या पहिल्याच प्रयत्नाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
ग्रामीण भागातील बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्रीही या स्टॉल्समध्ये केली जाईल. वाढती मागणी लक्षात घेता केवळ सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी एक स्टॉल ठेवला आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी शेती माल विक्री सुलभीकरणामागील भूमिका मांडली. ते म्हणाले, ”प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही शेतकर्यांच्या शासकीय कल्याणकारी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कृषी उत्पन्न थेट विक्रीची व्यवस्था केली होती. प्रतिसाद पाहिल्यानंतर आम्ही शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी असे कायमस्वरूपी स्टॉल्स उभारण्याचे ठरविले.”
पाहा व्हिडीओ:
Creative Ideas 👌