Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील राणीची बाग सोमवारपासून पुन्हा उघडण्याची शक्यता

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
rani bagh

मुक्तपीठ टीम

 

जंगलातील पशू-पक्षी-साप…सारं काही पुन्हा पाहता येणार. वाकुल्या दाखवणाऱ्या माकडांसोबतच महाकाय हत्तीही दिसणार. आणि हो पेंग्निनलाही भेटता येणार…तेही थे मुंबईतच. कारण आबालवृद्धांची आवडती राणीची बाग सोमवारपासून पुन्हा उघडण्यात येण्याची शक्यता आहे.

 

मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यात अनेक पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती. आता मुंबई मधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयाचा दरवाजा पर्यटकांसाठी उघडण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. जर परवानगी मिळाली तर येत्या १५ फेब्रुवारीपासून पर्यटकांना भायखळा प्राणीसंग्रहालयात प्रवेश मिळू शकतो.

 

बाग आणि प्राणीसंग्रहालय पुन्हा मुंबईकर आणि पर्यटकांना उघडल्यानंतर त्यांना ‘शक्ती’ आणि करिश्मा या दोन रॉयल बंगाल टायगर्स बघायला मिळतील. त्यांना औरंगाबादच्या प्राणीसंग्रहातून मुंबईत आणण्यात आले आहे. खरंतर, पर्यंटकांना त्यांना २५ मार्च २०२० पासूनच पाहता येणार होतं. पण त्याआधीच लॉकडाऊन सुरु झाला.

 

प्राणीसंग्रहालय पर्यटकांना खुले करावे यासाठी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्त यावर काय निर्णय घेतात यावरच पुढील निर्णय अवलंबून आहे.

 

गर्दी होणार नाही यासाठी नियम व अटी

  • उद्यानात पर्यटकांची गर्दी होऊ नये म्हणून जागोजागी ठराविक अंतरावर वर्तुळ आखण्यात आले आहे.
  • प्राणी-पक्ष्यांच्या पिंजऱ्यासमोर आणि तिकीट खिडकीजवळही असे गोल आखलेले आहेत.
  • तसेच जागोजागी सॅनिटायझर, कचराकुंडी आदींची सोय करण्यात आली आहे.
  • गर्दी वाढली तर मात्र त्यावेळे पुरते प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
  • सामान कक्षही बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे पर्यटकांनी सामान घेऊन येऊ नये.
  • पक्ष्यांच्या पिंजऱ्यातील पर्यटकांसाठी असलेला छोटा पूलही बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आत पिंजऱ्यात जाता येणार नाही, तर बाहेरूनच पक्षी पाहावे लागणार आहे.

 

राणीच्या बागेचं शुल्क

  • सध्या प्राणीसंग्रहालयात प्रौढ व्यक्तींना ५० रुपये शुल्क
  • तर लहान मुलांसाठी मुलावर २५ रुपये शुल्क आकारले जातात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: mumbaiMunicipal Commissioner Iqbal Singh ChahalRani baugZooप्राणीसंग्रहालयमनपा आयुक्त इक्बाल सिंह चहलमुंबईकर
Previous Post

जिल्हाधिकारी ‘हे’ वेगळे, शेतकऱ्यांना कार्यालयातच स्टॉल्स, भन्नाट विक्री

Next Post

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडमुळे महाराष्ट्राचे १,५८० कोटी वाचणार

Next Post
kanjurmarg

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडमुळे महाराष्ट्राचे १,५८० कोटी वाचणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!