Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकल कला, ग्लोबल मार्केट!  राज्यातील कारागिरांच्या वस्तू फ्लिपकार्टवर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
flipkart logo building-1

 मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्र राज्यातील हस्तकला व हातमाग कारागिरांच्या वस्तुंना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याची दारं उघडी झाली आहेत. ऑनलाईन विक्री करणारी आघाडीची कंपनी  मे. फ्लिपकार्ट यांच्या माध्यमातुन ही संधी उपलब्ध झाली आहे.  फ्लिपकार्टच्या ‘समर्थ’  या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन विक्री व्यासपीठावर विक्री करण्यासाठी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी  मे. फ्लिपकार्ट यांच्यासोबत नुकताच याबाबत करार केला आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात झालेल्या या सामंजस्य करारानुसार आता पैठणी साडी, सावंतवाडी लाकडी खेळणी, हिमरु शाली अशा वेगवेगळ्या हस्तकला जागतिक पातळीवर विक्री करता येतील.

या कार्यक्रमांतर्गत हस्तकला व हातमाग कारागिरांनी त्यांच्या वस्तु  या ऑनलाईन विक्री व्यासपीठावर विक्रीस ठेवल्यास पहिल्या सहा महिन्यापर्यंत मे. फ्लिपकार्ट यांच्यामार्फत कोणतेही कमिशन आकारण्यात येणार नाही.  या वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या कारागिरांना त्यांच्या 100 वस्तुंपर्यंत फोटोग्राफी  विनाशुल्क करण्यात येणार आहे.  याशिवाय कारागीरांना त्यांच्या वस्तुंचे ऑनलाईन विक्री  व पॅकेजिंग करण्याचे प्रशिक्षण विनाशुल्क देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन विक्रीची  सुरुवात  महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या  मऱ्हाटी महाराष्ट्र विक्रीदालन, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई येथून करण्यात येणार आहे.

या ऑनलाईन व्यापक स्वरुपाच्या बाजारपेठेत हस्तकला व हातमाग कारागीरांनी  उपलब्ध होत असलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यशासनाने केले आहे.

सामंजस्य करारादरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव बलदेव सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ श्रीमती निलिमा केरकट्टा, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ  प्रविण दराडे,  उपस्थित होते. तसेच फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कॉर्पोरेट कामकाज अधिकारी व वरिष्ठ उपाध्यक्ष रजनीश कुमार हे व्हिडीओ कॉनफरसिंगद्वारे नवी दिल्ली येथून  सहभागी झाले होते.

 


Tags: flipcarthandloomफ्लिपकार्टहस्तकलाहातमाग
Previous Post

सिडकोच्या भूखंडांना विक्रमी दर, ६७७ कोटींचा महसूल

Next Post

जिल्हाधिकारी ‘हे’ वेगळे, शेतकऱ्यांना कार्यालयातच स्टॉल्स, भन्नाट विक्री

Next Post
nanded

जिल्हाधिकारी ‘हे’ वेगळे, शेतकऱ्यांना कार्यालयातच स्टॉल्स, भन्नाट विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!