मुक्तपीठ टीम
दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मास्कबंदी लागू करण्यात आल्याची बातमी ताजी असतानाच आता आणखी काही राज्यांमध्ये स्थिती चिंताजनक दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १,२५,०७६ इतकी आहे. सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या पंजाब, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात १ हजार ८७७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संसर्ग कुठे आणि किती?
- पंजाब १३ हजार २५३
- महाराष्ट्र ११ हजार ८८९
- कर्नाटक १० हजार ३५१
- केरळ ९ हजार ८६५
- दिल्ली ८ हजार २०५
- तामिळनाडू ८ हजार ५८६
- पश्चिम बंगाल ६ हजार ६४६
कोरोनाचा दैनंदिन संसर्ग दर ४.५८%
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १६ हजार २९९ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
- त्याच वेळी ४९ रुग्णांचा मृत्यू झाला.
- देशात कोरोनाचा दैनंदिन संसर्ग दर ४.५८ टक्के आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सक्रिय प्रकरणांमध्ये ३ हजार १८५ रुग्ण कमी झाले आहेत.
- देशात आतापर्यंत आढळलेल्या एकूण प्रकरणांपैकी केवळ ०.२८ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत.