Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एका वर्षात सीएनजी-पीएनजी गॅस ७० टक्क्यांनी महागला! आता सरकार उपाय करणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cng price down by rs 6 kg png by rs 3.50 in maharashtra

मुक्तपीठ टीम

गेल्यावर्षाच्या सुरुवातीपर्यंत ४७ रुपये ९० पैसे प्रति किलो असणारा वाहनांसाठीचा सीएनजी आता ८६ रुपये प्रति किलो झाला आहे. पीएनजीही अशाच प्रकारे वाढत राहिला आहे. यामुळे सीएनजी आणि पीएनजी या दोन्ही गॅसच्या दरात जवळपास ७० टक्के दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय कारणांकडे बोट दाखवत स्वस्ताई आणि प्रदूषणमुक्त प्रवासाच्या आवडीतून गॅसवरील गाड्यांकडे वळलेल्या ग्राहकांना मोठा फटका दिला जात आहे. आता सरकारने गॅस दरवाढीत होरपळणाऱ्या ग्राहकांची दखल घेतली आहे. सरकारने त्यावर उपाय करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा नेमका काय फायदा होतो, ते लवकरच कळेल.

सीएनजी गॅसच्या महागाईचा भडका

महिना                 प्रति  किलो दर        झालेली वाढ
ऑगस्ट२०२२          ८६ रुपये                   ६ रुपये
जुलै २०२२             ८० रुपये                    ४ रुपये
मे २०२२                ७६ रुपये                   ४ रुपये
एप्रिल २०२२            ७२ रुपये                  २२.६० रुपये
एप्रिल २०२१            ४९.४० रुपये              १.५० रुपये
फेब्रुवारी २०२१          ४७.९० रुपये             ०.० रुपये

इंधनाच्या वापरामुळे गेल्या वर्षभरात सीएनजी आणि पीएनजीच्या किमती ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत, असे कारण सांगितले जात आहे.

आता घरातील पाइप आणि वाहनांचा सीएनजी स्वस्त होणार?

  • सुमारे तीन महिन्यांपूर्वी, मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह इंधन सीएनजी आणि पीएनजीची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी आयात केल्या जाणाऱ्या एलएनजीचा वापर करण्याचे निर्देश दिले.
  • आता मात्र महागाईचा भडका पाहून वाहनांच्या गॅससाठी मुख्यतः देशांतर्गत उत्पादित गॅसचा पुरवठा करण्याच्या जुन्या धोरणाकडे वळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • मुंबईच्या महानगर गॅस लिमिटेड (MGL) आणि दिल्लीच्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) यांच्यासारख्या शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी पुरवठा १७.५ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वरून २७.७८ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन करण्यात आले आहे.
  • ९४% वाढीव पुरवठ्याचा वापर वाहनांमध्ये सीएनजी आणि घरांमध्ये पीएनजीसाठी करण्यात येईल.
  • पूर्वी केवळ ८४ टक्के गॅस देशातून येत होता, उर्वरित गॅस गेल कंपनी आयात करत होती.
  • आयातित इंधनाऐवजी घरगुती गॅसचा वापर केल्यास कच्च्या मालाची किंमत कमी होईल आणि सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होतील.
  • ऑपरेटर्सच्या महागड्या एलएनजीच्या वापरामुळे गेल्या वर्षभरात सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

Tags: central govtCNG GasPNG gasकेंद्र सरकारपीएनजीसीएनजी
Previous Post

मविआविरुद्ध लढत झाली तर लोकसभेला भाजपा-शिंदे गटाला मोठा फटका! फार तर १८ जागा!

Next Post

कोरोनाचा पुन्हा फैलाव? पंजाब-महाराष्ट्र-कर्नाटकात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण!

Next Post
corona

कोरोनाचा पुन्हा फैलाव? पंजाब-महाराष्ट्र-कर्नाटकात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!