Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विश्लेषण: बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्षपदी, तर शेलार मुंबई अध्यक्षपदी! समजून घ्या नियुक्त्यांमागील भाजपाची राजकीय गरज…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Chandrashekhar Bawankule & Ashish Shelar appointment on bjp party posts

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष कोणाला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर भाजपा प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे आणि भाजप नेते आशिष शेलार यांचना मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण जबाबादारी देण्यात आली आहे.

कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे?

  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा मंत्रिपद सांभाळले आहे.
  • डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • २००४, २००९, २०१४ असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.
  • तरीही पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना २०१९च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली.
  • त्यांचा भाजपाला निवडणुकीत फटकाही बसला. त्यामुळे त्यांना ओबीसी नेता म्हणून सक्रिय करण्यात आले.
  • त्यानंतर काही महिन्यांपूर्वी नागपूर विधानपरिषदेवर बावनकुळेंना स्थान देण्यात आलं.
  • महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या रुपाने मराठा नेता, उपमुख्यमंत्रीपदी ब्राह्मण नेता असल्याने ओबीसी मतांसाठी भाजपाने सामाजिक समीकरण साधण्यासाठी ओबीसी नेते असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंची अध्यक्षपदी निवड केली असावी.

आशिष शेलारांना का देण्यात आली ही जबाबदारी?

  • आशिष शेलार हे या आधीही मुंबईचे भाजपाचे अध्यक्ष होते.
  • त्यांच्या नेतृत्वाखालीच भाजपाने २०१७च्या निवडणुकीत दुपटीपेक्षा जास्त जागांवर झेप घेतली होती. भाजपाने स्वबळावर ८०चा आकडा ओलांडला होता.
  • आगामी मुंबई महापालिकेची निवडणुकीचं महत्व लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे पुन्हा सोपवण्यात आली आहे.
  • तसेच आशिर शेलार हे कोकणातील आहेत, मराठा आहेत, त्याचा फायदा मुंबईतील मराठी मतदारांमध्ये असलेले शिवसेनेचे प्रभूत्व कमी करण्यासाठी होऊ शकेल.
  • मुंबईतील मराठी मतदारांमध्ये कोकणी मतदारांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे.

बावनकुळे, शेलारांचं मंत्रीपद का नाही ते झालं स्पष्ट!

  • शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मराठा नेते आशिष शेलार यांचा समावेश का नाही, अशी चर्चा रंगली होती.
  • पण आता त्यामागील कारण स्पष्ट झालं आहे.
  • एकाच व्यक्तीकडे मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपद देण्याचे धोरण भाजपात नाही, त्यामुळे त्यांना मंत्रीपदासाठी निवडण्यात आले नाही.

Tags: ashish shelarBJPBMC electionchandrashekhar bawankuleआशिष शेलारचंद्रशेखर बावनकुळेभाजपामुंबई मनपा निवडणूक
Previous Post

कोरोनाचा पुन्हा फैलाव? पंजाब-महाराष्ट्र-कर्नाटकात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण!

Next Post

राज्यात १९७५ नवे रुग्ण, १९०४ बरे! मुंबई ८७१, नाशिक ३७, नागपूर ४५ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १९७५ नवे रुग्ण, १९०४ बरे! मुंबई ८७१, नाशिक ३७, नागपूर ४५ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!