मुक्तपीठ टीम
भारतात व्हॉट्सअॅप पेमेंट्सची सुविधा सहा महिन्यांपासुन सुरू झाली आहे. व्हॉट्सअॅपचे भारतात ४०० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. २०१८ मध्ये सर्वात प्रथम फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने भारतात यूपीआय आधारित पेमेंट सेवेचे टेस्टिंग सुरू केले होते. सुरूवातीला हे टेस्टिंग १० लाख लोकांपर्यंतच मर्यादित होते. कारण, यासाठी परवानगी मिळाली नव्हती. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली होती. यानंतर १ जानेवारी २०२१ पासून लागू झाले. तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असल्यास व्हॉट्सअॅप पेमेंट सक्रिय करू शकता. चला तर जाणून घेऊया व्हॉट्सअॅप पेमेंट कसं अॅक्टीवेट करायचं.
- प्रथम व्हॉट्सअॅप सुरु केल्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या ३ डॉट्स वर क्लिक करा.
- नंतर सेटिंग ओपन केल्यावर पेमेंटचा ऑप्शनवर क्लिक करा.
- व्हॉट्सअॅप तुम्हाला तुमचं बॅक अकाउंट लिंक करण्यास सांगेल.
- बॅक अकाउंट लिंक करताना व्हॉट्सअॅप तुम्हाला काही नियम आणि अटीं मान्य करण्यास सांगेल.
- तुम्ही आय अॅग्री बटणावर क्लिक करु शकता अथवा मागच्या मेनू मध्ये जाऊ शकता.
- यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागेल.
- इथून पुढे यूपीआय व्हेरिफिकेशनला सुरुवात होईल.
- मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर आपल्याला बर्याच बँकांची यादी दिसेल.
- त्यानंतर व्हॉट्सअॅप तुम्हाला व्हिपीए बनवण्यास सांगेल, तुम्ही त्यावर क्लिक करा, व्हिपीए तयार होईल.
- व्हॉट्सअॅप तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारेल. तसेच इतरही काही माहितीची मागणी केली जाईल.
- त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅपवरील मनी ट्रान्सफर हे फिचर वापरु शकता.