Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकल श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न 

आदिवासींशी एकरूप होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न व्हावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

November 14, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सव

मुक्तपीठ टीम

आदिवासी समाज आजही कठीण परिस्थितीत राहत आहे. त्यामुळे आदिवासींच्या केवळ सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी प्रयत्न न करता त्यांचेसही एकरूप होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
आदिवासींच्या सामाजिक सांस्कृतिक उन्नतीसाठी कार्य करीत असलेल्या एकल श्रीहरी समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त शनिवारी (दि १३) गरवारे क्लब, मुंबई येथे आयोजित ‘दीपावली संमेलन’ कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी बोलत होते.
श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सव

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केवळ धन देणे पुरेसे नाही असे नमूद करून त्यासाठी त्यांचेशी तादात्म्य होऊन काम करणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले. अनेक निःस्वार्थ कार्यकर्त्यांनी आपले जीवन उत्तर पूर्व भारतात आदिवासी विकासासाठी व्यतीत केल्यामुळे तसेच तेथील संस्कृतीशी एकरूप झाल्यामुळे आज तो भाग बव्हंशी शांत आहे असे राज्यपालांनी सांगितले.
मुंबईपासून शंभर किलोमीटर दूर असलेल्या पालघर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मोबाईल संपर्क होत नाही असे नमूद करून शहरी सधन समाजाने आदिवासी बांधवांकडून बांबू राखी, फर्निचर, आकाश दिवे आदी वस्तू खरेदी करून त्यांना विकासात सहभागी करून घेतले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सव

आदिवासींना कौशल्य शिक्षण देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे सांगताना राज्यपालांनी एकल श्रीहरी समितीच्या कार्याचे कौतुक केले.
एकल श्रीहरी समितीतर्फे देशभर ७०,००० संस्कार केंद्र चालविले जात असून अनेक श्रीहरी रथ तसेच गौग्राम योजना आदी राबविल्या जात असल्याचे एकल श्रीहरी मुंबईचे अध्यक्ष विजय केडिया यांनी सांगितले.
कार्यक्रमाला एकल श्रीहरीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यनारायण काबरा, आमदार मंगल प्रभात लोढा, रौप्य महोत्सव समितीच्या अध्यक्षा मीना अग्रवाल व एकल श्रीहरीचे महासचिव माधवेंद्र सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सव

यावेळी राज्यपालांच्या हस्ते १५ गणमान्य व्यक्तींना एकल श्रीहरी सन्मान प्रदान करण्यात आले.
वरूण व ज्योती काबरा, गोपाळ कंडोई, रमाकांत टिबरेवाल, श्रीनारायण व मीना अगरवाल, विजय केडिया, सुरेश खंडेलिया, महावीर प्रसाद गुप्ता, रामविलास अग्रवाल, रामावतार मोदी, रामप्रकाश बुबना, चंद्रप्रकाश सिंघानिया, रमा पहेलजानी, महेश मित्तल, मंगलप्रभात व मंजू लोढा व प्रदीप गोयल यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


Tags: Bhagatsingh koshyariShrihari SamitiSilver Jubileetribal Peoplesआदिवासी बांधवभगतसिंह कोश्यारीरौप्य महोत्सवश्रीहरी समिती
Previous Post

संवेदना जागवा सरकार संवेदना…आत्महत्येचा प्रयत्न, ह्रदयविकाराने मृत्यू! एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निलंबनाची दहशत!!

Next Post

देशातील सर्वात मोठा बिटकॉइन घोटाळा! सूत्रधार २६ वर्षांचा हॅकर, ८ व्या वर्षांपासून इंटरनेटवर!!

Next Post
bitcoin scam

देशातील सर्वात मोठा बिटकॉइन घोटाळा! सूत्रधार २६ वर्षांचा हॅकर, ८ व्या वर्षांपासून इंटरनेटवर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!