Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संवेदना जागवा सरकार संवेदना…आत्महत्येचा प्रयत्न, ह्रदयविकाराने मृत्यू! एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निलंबनाची दहशत!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
st employee

मुक्तपीठ टीम

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाले तर हक्काचं योग्य वेतन वेळेवर मिळेल या अपेक्षेनं कर्मचारी लढत आहेत. मात्र, त्याचवेळी सरकारची भूमिका कमालीची ताठर आहे. निलंबनाचा वरंवटा फिरत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरत आहे. पालघरमध्ये एका कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला, तर कोल्हापूरात एका कर्मचाऱ्याचा ह्रदयविकारानं मृत्यू ओढवला. हा मृत्यू कारवाईच्या भीतीने झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. संप मिटवण्यासाठी सरकारने संवेदनशीलता दाखवत पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. केवळ भाजपा नेते माध्यमांशी बोलत असल्याने संप त्यांचा आहे, असं सरकारने समजून कर्मचाऱ्यांवर राग काढू नये असे मतही कर्मचारी व्यक्त करत आहेत.

 

पालघरमधील एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

  • राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.
  • कर्मचारी संपावर असल्यामुळे बसफेऱ्या बंद आहेत.
  • राज्यभर आंदोलन सुरु असताना पालघर जिल्ह्यातील जव्हार बस डेपोतील दीपक खोरगडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
  • सध्या कमी पगार आहे.
  • तसेच पगारात वाढ होत नसल्यामुळे मानसिक स्थिती ढासल्यामुळे खोरगडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
  • त्यांच्यावर जव्हार कुटीर रूग्णालयात उपचार सुरु होते.
  • प्रकृती नाजुक असल्यामुळे आता त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे.

 

कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

  • कोल्हापूरातील एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ पसरली आहे.
  • अनिल मारुती कांबळे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
  • ते २०१५ साली कामावर रुजू झाले होते.
  • गारगोटी जवळील मडीलगे खुर्द गावचे रहिवासी आहेत.
  • सध्या सावंतवाडी आगार चालक कम वाहक म्हणून काम करत होते
  • संप असल्याने ते मडीलगे येथे राहायला होते.
  • गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

Tags: KolhapurPalgharST Employeeएसटी कर्मचारीकोल्हापूरपालघर
Previous Post

नॅशनल एल्युमिनियम कंपनीत ८६ जागांसाठी भरती

Next Post

एकल श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न 

Next Post
श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सव

एकल श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!