Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशातील सर्वात मोठा बिटकॉइन घोटाळा! सूत्रधार २६ वर्षांचा हॅकर, ८ व्या वर्षांपासून इंटरनेटवर!!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
bitcoin scam

मुक्तपीठ टीम

देशातील सर्वात मोठ्या बिटकॉइन घोटाळ्यात पकडलेल्या हॅकरने दावा केला आहे की, त्याने वयाच्या ८व्या वर्षापासूनच नेटचे बारकावे शिकायला सुरुवात केली. श्रीकृष्ण रमेश नावाचा हा हॅकर सध्या कर्नाटक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. सध्या २६ वर्षे वय असलेल्या या तरुण हॅकरची आता कसून चौकशी सुरु आहे.

 

वय २६, घोटाळा अचंबित करणारा!

  • श्री कृष्ण उर्फ ​​श्रीकीला गेल्या वर्षी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२० रोजी पकडण्यात आले होते.
  • अंमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
  • त्याने डार्क वेबवर बिटकॉइनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज विक्रेत्यांकडून अंमली पदार्थ खरेदी केले होते.
  • मात्र, चौकशीदरम्यान जे काही समोर आले त्यामुळे लोक थक्क झाले. फसवणूकीतून मिळवलेल्या कोट्यवधी रुपयांपैकी त्याने एकही पैसा बचत केली नाही.
  • हॉटेलिंगमध्ये दररोज लाखो रुपये खर्च केल्याचेही त्यांनी सांगितले.
  • व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या श्रीकीचा अनेक ऑनलाइन गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.

महाघोटाळा करणाऱ्या या हॅकरवरील आरोप

  • श्रीकी हा हॅकर्सच्या गटाचा सदस्य होता ज्यानी २ ऑगस्ट २०१६ रोजी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बिटफिनेक्स हॅक केले.
  • त्यानंतर या लोकांनी तेथून सुमारे एक लाख वीस हजार बिटकॉइन चोरले.
  • या बिटकॉइन्सची किंमत जवळजवळ ३.५ अब्ज रुपये इतकी होती.
  • याशिवाय, कर्नाटकातील ई-गव्हर्नन्स सेंटरच्या प्रोक्योरमेंट सेलमधूनही त्याने ११.५ कोटी रुपयांची चोरी केल्याचे श्रीकीने सांगितले.
  • श्रीकी मिरर साइट्स तयार करण्यात आणि बनावट पेमेंट पोर्टल तयार करून, लोकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील चोरण्यात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यात तज्ञ होता.

 

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने असा दावा केला आहे की, वयाच्या ८व्या वर्षापासून त्याने हे तांत्रिक बारकावे शिकायला सुरुवात केली. तो चौथीत असताना जावा, रिव्हर्स इंजिनीअरिंग शिकला होता. इतकंच नाही तर, त्याने त्याच वेळी रनस्केप हा पहिला बॉट गेमही विकसित केला. सध्या पोलीस या दाव्यांचा तपास करत आहेत.


Tags: bitcoin scamCyber cell policecybercrimemuktpeethबिटकॉइन घोटाळाबिटकॉइन हॅकर्समुक्तपीठसायबर क्राईमहॅकर
Previous Post

एकल श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न 

Next Post

टॉपचा नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे ठार! गडचिरोलीतील पोलीस कारवाईत मारला गेला!!

Next Post
gadchiroli

टॉपचा नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे ठार! गडचिरोलीतील पोलीस कारवाईत मारला गेला!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!