Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या दादागिरीविरोधात शिवसेना आक्रमक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gajajnan Kirtikar Ajit Pawar Rohit Pawar Shrikant Shinde

मुक्तपीठ टीम

आघाडीचे नेते तिन्ही पक्षांमध्ये वरकरणी शांती असल्याचे भासवत असले तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर आतून कुस्ती सुरु असल्याचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डावलत असल्याचे आरोप आतापर्यंत अनेकवेळा शिवसेनेच्या काही नेत्यांनी केले आहेत. आताही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर शिवसैनिक फोडण्यावरून आणि शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील निधीवाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. कीर्तीकर, शिंदे यांनी राष्ट्रवादीविरोधात उठवलेला आवाज आताचा असला तरी याआधी माजी खासदार अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अन्य नेत्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले गजानन किर्तीकर?

  • रोहित पवार यांनी स्वत:चा पक्ष वाढवावा.
  • त्यांना तो अधिकार आहे, आम्हीदेखील याठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी आलो आहोत.
  • परंतु प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी निधी मिळून द्यायचा नाही.
  • शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कोंडी करून, त्यांच्यावर दबाव आणून त्यांना पक्ष सोडायला लावायचा, हे प्रकार तुम्हाला शोभणारे नाहीत.
  • तुम्ही शरद पवार यांचे नातू आहात.
  • उद्या वेळ पडल्यास मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून या सगळ्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करेन.
  • शरद पवार यांनाही हा प्रकार मंजूर नसेल.
  • तेदेखील रोहित पवार यांना चार शब्द सुनावतील.

श्रीकांत शिंदे यांचा घरचा आहेर!

  • महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा काही नियम, त्रिसूत्री मांडली गेली होती.
  • मंत्रीपदाचे समसमान वाटप केले गेले होते.
  • त्याचबरोबर निधीचे समसमान वाटप करण्याचेही ठरले होते.
  • निधीबाबत ६०-२०-२० असे सूत्र ठरले होता.
  • एखाद्या पक्षाचे पालकमंत्री असतील तिथे दुसऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना कमीत कमी २० टक्के निधी मिळायला हवा.
  • सातारा जिल्ह्यात असे झाल्याचे आढळत नाही.
  • शिवसंपर्क अभियानांतर्गत सर्वेक्षणातून हे समोर आले आहे.
  • अन्य घटक पक्षांनी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.
  • या गोष्टी आम्ही पक्षप्रमुखांपर्यंत नेणार आहोत

यापूर्वीही शिवसेनेच्या नेत्यांनी उठवला राष्ट्रवादीविरोधात आवाज

लिंक क्लिक करा आणि वाचा:

“शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म!” अनंत गीतेंसारख्यांच्या उद्रेकामागील समजून घ्या कारणं…

“ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद पवारांचे आशीर्वाद” खा. कोल्हेंवर सेना प्रवक्ते कान्हेरे संतापले, मुख्य प्रवक्ते राऊतांचे वादावर पाणी!

पुणे झालं, कोकण झालं, आता जळगाव! शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना का रंगतो?


Tags: ajit pawarDr. Shrikant ShindeGajanan KirtikarMaharashtramuktpeethNCProhit pawarShivsenaराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Previous Post

फडणवीस म्हणतात, तिसरा उमेदवार विचारपूर्वक दिला! आमचे उमेदवार स्थानिकच!!

Next Post

UPSC 2021 निकाल जाहीरही झाला, MPSC 2020 निकालाची अद्याप प्रतीक्षा! असं का?

Next Post
shruti sharma

UPSC 2021 निकाल जाहीरही झाला, MPSC 2020 निकालाची अद्याप प्रतीक्षा! असं का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!