Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फडणवीस म्हणतात, तिसरा उमेदवार विचारपूर्वक दिला! आमचे उमेदवार स्थानिकच!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Devendra Fadnavis And dhananjay Mahadik

मुक्तपीठ टीम

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने सहाव्या जागेसाठी आपला तिसरा उमेदवार कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना घोषित केल्याने शिवसेनेसमोर कडक आव्हान उभं राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला उमेदवार द्यायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे, असं म्हटलं होतं. त्यावरून महविकास आघाडीला राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जो फॉर्म्युला सांगितला आहे, तो आघाडीला मान्य होईल, असा नाहीच!

काय म्हणाले फडणवीस?

  • आम्हाला घोडेबाजार करायचा नाही, आमचे तीनही उमेदवार निवडून येणार आहेत.
  • त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, आमचे तीन आणि त्यांचे तीन उमेदवार आहेत. त्यांनी त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा. मग घोडेबाजाराचा प्रश्नच उद्भवणार नाही. जरी त्यांनी उमेदवार ठेवला तरी आम्ही घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार भाजपाचे आहेत. महाराष्ट्रातील आहे. राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. काही लोकं आम्हाला मतदान करणार आहेत. याचा आम्हाला विश्वास आहे. यावेळी आम्ही तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरलाय तो काही विचारपू्र्वक भरला आहे.
  • त्यामुळे तिसरा उमेदवार निवडून आणू असा विश्वास आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रस्सीखेच!

  • देशात राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे.
  • या जागांसाठी महाराष्ट्रातून ७ उमेदवार आहेत.
  • महाराष्ट्रातील भाजपाच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
  • यामध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
  • दुसरीकडे, संख्याबळानुसार महाराष्ट्रात भाजपा दोन, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी होणार आहे.
  • तर सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आहेत.

Tags: BJPdevendra fadnavisdhananjay shindeKolhapurकोल्हापूरदेवेंद्र फडणवीसभाजपा
Previous Post

जाहिरात केली, पण एमएमआरडीएचे २४ कोटी लक्ष्य मीडियाने दिलेच नाहीत!

Next Post

राष्ट्रवादीच्या दादागिरीविरोधात शिवसेना आक्रमक

Next Post
Gajajnan Kirtikar Ajit Pawar Rohit Pawar Shrikant Shinde

राष्ट्रवादीच्या दादागिरीविरोधात शिवसेना आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!