Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद पवारांचे आशीर्वाद” खा. कोल्हेंवर सेना प्रवक्ते कान्हेरे संतापले, मुख्य प्रवक्ते राऊतांचे वादावर पाणी!

राष्ट्रवादी आमदार मोहितेंना आव्हान देणाऱ्या राऊतांनी स्थानिक वाद म्हणत कमी लेखल्यानं आश्चर्य

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mva

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या वादामध्ये आता खासदार अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे पेट्रोल ओतले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असे विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केले होते. यावर शिवसेनेने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे, शिवसेना प्रवक्त्यांनी महाविकास आघाडीत विखार पसरवू नये, ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका” असा सल्लाही शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी दिला आहे. मात्र, मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते असल्याने शरद पवारांचे आशीर्वाद असतात, असं म्हणत सेना-राष्ट्रवादीत भडकू पाहणाऱ्या आगीवर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला आहे. या वादाला स्थानिक वाद म्हणून कमी लेखणाऱ्या संजय राऊत यांनी याच मतदारसंघातील स्थानिक वादात तेथे जाऊन राष्ट्रवादीच्या आमदाराला पाडण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे शिरुर मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

खासदार अमोल कोल्हेंच्या कोणत्या वक्तव्यावरून आग पेटली?

  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत.
  • राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे.
  • निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे.
  • मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय.
  • दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळत आहे.
  • वयस्कर नेते असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं. (त्यांचा रोख शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे होता.)

शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांचे कोल्हेंना तडाखेबंद उत्तर

  • बहुतेक अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली आहे.
  • तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे झाले आहे.
  • आपण ज्या उद्धवसाहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले.
  • अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?
  • ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका.
  • उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत.
  • त्यामुळे तुम्ही एवढा विचार करू नका, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमताही नाही.
  • त्यामुळे दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पाहा, फार डोके चालवू नका.

मुख्य प्रवक्ते संजय राऊतांचे वादावर पाणी

  • तो माजी आणि आजी खासदारांमधील वाद आहे. असे वाद युतीतही स्थानिक पातळीवर होत होते.
  • हे स्थानिक वाद आहेत, तेथेच मिटतील. त्याला राज्याच्या किंवा देशाच्या पातळीवरी नेत्यांशी जोडू नका. आम्ही त्या वादांकडे पाहतही नाही.
  • हे स्वत: उद्धव ठाकरेंनीही मान्य केले आहे. या सरकारला आदरणीय शरद पवारसाहेबांचे आशीर्वाद आहेत. आशीर्वाद आहेतच ना.
  • पवारसाहेबांचे अनुभव आणि वय आशीर्वाद देण्यासारखेच आहेत ना? आजही आम्ही त्यांच्या पायाला झुकून नमस्कार करतोच ना. मुख्यमंत्री अनेकदा करतात.
  • शिवसेनाप्रमुखांच्या संदर्भात अनेक राजकीय पक्षांचे लोक एक आशीर्वादाचा हात आहे, म्हणूनच पायाला हात लावत असत.
  • अमोल कोल्हेंच्या बोलण्याचा टोन वेगळा असतो. राणा भिमदेवी थाटात बोलले असतील. बोलू द्या.
  • हे सरकार आहे ते तिघांच्या सहकार्यानं, तिघांच्या मदतीनं बनलेलं सरकार आहे. त्यात सोनिया गांधीही आहेत. माननीय पवारसाहेबही आहेत. आणि या सर्वाला उद्धव ठाकरेंनी संमती दिली नसती तर सरकार बनलं असतं का?

 

याआधी शिरुर मतदारसंघातील शिवसेना राष्ट्रवादी स्थानिक वादावर काय होती खासदार संजय राऊतांची भूमिका नक्की वाचा:

खेडमध्ये ठिणगी! पवारांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांचा राष्ट्रवादी आमदाराला आवाज!!


Tags: amol kolhecm uddhav thackeraykishor kanhereMVAsanjay rautsharad pawarShivsenaअमोल कोल्हेउद्धव ठाकरेकिशोर कान्हेरेमहाविकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारशिवसेनासंजय राऊत
Previous Post

शिवसेना मुंडेंना आणि मुंडे शिवसेनेला किती मानवतील?

Next Post

राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांवरील भाषणांचा विपर्यास, चंद्रकांत पाटलांना लिंक पाठवणार!

Next Post
Raj Thackeray Chandrakant Patil Nashik meeting (2)

राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांवरील भाषणांचा विपर्यास, चंद्रकांत पाटलांना लिंक पाठवणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!