मुक्तपीठ टीम
आघाडीचे नेते तिन्ही पक्षांमध्ये वरकरणी शांती असल्याचे भासवत असले तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर आतून कुस्ती सुरु असल्याचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डावलत असल्याचे आरोप आतापर्यंत अनेकवेळा शिवसेनेच्या काही नेत्यांनी केले आहेत. आताही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर शिवसैनिक फोडण्यावरून आणि शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील निधीवाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. कीर्तीकर, शिंदे यांनी राष्ट्रवादीविरोधात उठवलेला आवाज आताचा असला तरी याआधी माजी खासदार अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अन्य नेत्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले गजानन किर्तीकर?
- रोहित पवार यांनी स्वत:चा पक्ष वाढवावा.
- त्यांना तो अधिकार आहे, आम्हीदेखील याठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी आलो आहोत.
- परंतु प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी निधी मिळून द्यायचा नाही.
- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कोंडी करून, त्यांच्यावर दबाव आणून त्यांना पक्ष सोडायला लावायचा, हे प्रकार तुम्हाला शोभणारे नाहीत.
- तुम्ही शरद पवार यांचे नातू आहात.
- उद्या वेळ पडल्यास मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून या सगळ्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करेन.
- शरद पवार यांनाही हा प्रकार मंजूर नसेल.
- तेदेखील रोहित पवार यांना चार शब्द सुनावतील.
श्रीकांत शिंदे यांचा घरचा आहेर!
- महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा काही नियम, त्रिसूत्री मांडली गेली होती.
- मंत्रीपदाचे समसमान वाटप केले गेले होते.
- त्याचबरोबर निधीचे समसमान वाटप करण्याचेही ठरले होते.
- निधीबाबत ६०-२०-२० असे सूत्र ठरले होता.
- एखाद्या पक्षाचे पालकमंत्री असतील तिथे दुसऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना कमीत कमी २० टक्के निधी मिळायला हवा.
- सातारा जिल्ह्यात असे झाल्याचे आढळत नाही.
- शिवसंपर्क अभियानांतर्गत सर्वेक्षणातून हे समोर आले आहे.
- अन्य घटक पक्षांनी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.
- या गोष्टी आम्ही पक्षप्रमुखांपर्यंत नेणार आहोत
यापूर्वीही शिवसेनेच्या नेत्यांनी उठवला राष्ट्रवादीविरोधात आवाज
लिंक क्लिक करा आणि वाचा:
पुणे झालं, कोकण झालं, आता जळगाव! शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना का रंगतो?