मुक्तपीठ टीम
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अप्रत्यक्ष धमकी देण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत स्वत: ही धक्कादायक माहिती दिली आहे. माझी पाच वर्षांची लेक आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय. माझ्या जीवाला धोका आहे, बाहेर पडू नका असे इनपुट मला आले असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. या बाबत उद्धव ठाकरे यांना कळवले असून सुरक्षा पुरावण्याबाबत पक्षाने पाऊले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.
सुषमा अंधारेंना कुणापासून धोका?
- माझी पाच वर्षांची लेक आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय.
- काही इनपूट्स आले आहेत.
- ज्यामध्ये असं समजलं की, बाहेर पडू नका.
- कोणी हल्ला करेन, धक्काबुक्की करेन.
- काल विद्यापिठात एलआयबीचे लोक माझ्याजवळ आले, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, लोहगाव पोलीस स्टेशनचे फोन येत होते आणि विचारलं जात होतं की तुम्ही सुरक्षित आहात का? मला समजलं नाही की असं का सुरू आहे.
- मग लक्षात आलं की त्यांच्याकडे काहीतरी गोपनीय माहिती आहे, काहीतरी सुरू आहे.
बाळाच्या काळजीनं मांडली वेदना…
- मला शूट करतील का?
- वेगवेगळ्या प्रकरणात किंवा विविध पद्धतीने.
- तर मला काय चिंता आहे, माझ्याकडे एक पाच वर्षांचं बाळ आहे.
- म्हणून मी आज अगदी जाहीरपणे सांगितलं की मी शिवसेनेला माझं बाळ दत्तक देते, जेवढे शिवसैनिक आहेत ते मामा म्हणून त्याला सांभाळतील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील.
उद्धव ठाकरे यांना माहिती दिली!!
- काल माझ्या घराखाली दोन पोलीस येऊन थांबले होते.
- त्यांनी काळजी घ्या असे सांगत काही वाटले तर आम्हाला सांगा असे सांगितले.
- याबाबत उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली आहे.
- या बाबत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे.
- मला संरक्षण देण्याबाबत पक्षाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिलेले आहे असेही अंधारे म्हणाल्या आहेत.