Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी विलिनीकरणात राजकारण्यांना कसली अडचण? शरद पवारांनी उघड केली भीती…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharad Pawar

मुक्तपीठ टीम

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली, मात्र असं असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप हा सुरु ठेवला आहे. त्यांची मागणी आहे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावं, ही आहे. विलिनीकरण करण्यात राजकीय नेत्याना नेमक्या कोणत्या अडचणींची भीती वाटते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्टपणे मांडले आहे.

 

काय म्हणाले शरद पवार?

  • शरद पवार बुधवारी महाबळेश्वरला होते.
  • यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
  • यावेळी त्यांनी एसटीच्या संपावरही प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • राज्यात एसटीचे ९६ हजार कर्मचारी आहेत.
  • एसटीसह आरोग्य सेविका, आशा वर्कर, खनिकाम करणारे लोक आणि इतर महामंडळं आहेत.
  • एकदा एसटीच्या विलीनीकरणाचं सूत्रं स्वीकारलं तर ते या सर्व महामंडळांना लागू होईल.
  • त्याचं आर्थिक चित्रं काय राहील हे सरकारनं तपासलं पाहिजे, असं पवार म्हणाले.
  • एखादा कामगाराने एसटीत नोकरीकडे अर्ज केला तर त्याचा अर्ज स्टेट ट्रान्सपोर्टकडे जातो.
  • तो त्या संस्थेचा कामगार होतो. त्या संस्थेला बांधिल राहतो.
  • अशावेळी या संस्थेच्या कर्मचाऱ्याने दुसऱ्या संस्थेत घ्या म्हणणं कसं राहील? असा सवालही त्यांनी केला.

 

राज्य सरकार विलीनीकरणाची मागणी सोडून सर्व मागण्या मान्य करण्यासाठी तयार

  • राज्यात एकूण ५५ महामंडळे आहेत.
  • त्यापैकी ३५ महामंडळांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे.
  • त्यामुळे सरकारला या महामंडळांचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
  • काही महामंडळांची स्थिती इतकी वाईट आहे की त्यांना कधीही टाळे लागू शकते.
  • एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण केलं तर या महामंडळांकडूनही विलीनीकरणाची मागणी जोर धरेल.
  • त्यामुळे सरकारसाठी ही डोकेदुखी ठरू शकते.
  • त्यातही आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील आदींची संख्या राज्यात अधिक आहे.
  • त्यांचीही आंदोलने उभी राहू शकतात.
  • एसटी महामंडळाचं विलीनीकरण होऊ शकतं तर आमचं का नाही? असा युक्तिवाद कोर्टात केला जाऊ शकतो.
  • त्यामुळेही राज्य सरकार विलीनीकरणाची मागणी सोडून एसटी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 

राज्यातील काही महामंडळे

  • महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
  • महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ
  • महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ
  • महाराष्ट्र शहर औद्योगिक विकास महामंडळ
  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि.
  • महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ
  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
  • महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
  • महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्या.
  • हाफकीन बायो-फार्मास्युटीकल महामंडळ मर्या.
  • हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था
  • तापी पाटबंधारे विकास महामंडळ
  • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
  • महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ
  • इतर मागासवर्ग विकास महामंडळ
  • संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.
  • वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित
  • महाराष्ट्र वखार महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
  • मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
  • महिला आर्थिक विकास महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन २०१०
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ.
  • महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ.

 

राज्य सरकारच्या अख्यतारीतील मंडळे

  • महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ
  • महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ
  • महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ
  • महाराष्ट्र ज्ञान महामंडळ
  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ
  • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

Tags: Anil Parabsharad pawarST Strikeअनिल परबएसटी महामंडळएसटी संपशरद पवार
Previous Post

सदाभाऊ खोत- गोपीचंद पडळकरांनी मैदान सोडले, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच!

Next Post

संविधान दिनानिमित्त जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

Next Post
jagdishabda foundation

संविधान दिनानिमित्त जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!