मुक्तपीठ टीम
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली, मात्र असं असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप हा सुरु ठेवला आहे. त्यांची मागणी आहे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावं, ही आहे. विलिनीकरण करण्यात राजकीय नेत्याना नेमक्या कोणत्या अडचणींची भीती वाटते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्टपणे मांडले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
- शरद पवार बुधवारी महाबळेश्वरला होते.
- यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
- यावेळी त्यांनी एसटीच्या संपावरही प्रतिक्रिया व्यक्त केली.
- राज्यात एसटीचे ९६ हजार कर्मचारी आहेत.
- एसटीसह आरोग्य सेविका, आशा वर्कर, खनिकाम करणारे लोक आणि इतर महामंडळं आहेत.
- एकदा एसटीच्या विलीनीकरणाचं सूत्रं स्वीकारलं तर ते या सर्व महामंडळांना लागू होईल.
- त्याचं आर्थिक चित्रं काय राहील हे सरकारनं तपासलं पाहिजे, असं पवार म्हणाले.
- एखादा कामगाराने एसटीत नोकरीकडे अर्ज केला तर त्याचा अर्ज स्टेट ट्रान्सपोर्टकडे जातो.
- तो त्या संस्थेचा कामगार होतो. त्या संस्थेला बांधिल राहतो.
- अशावेळी या संस्थेच्या कर्मचाऱ्याने दुसऱ्या संस्थेत घ्या म्हणणं कसं राहील? असा सवालही त्यांनी केला.
राज्य सरकार विलीनीकरणाची मागणी सोडून सर्व मागण्या मान्य करण्यासाठी तयार
- राज्यात एकूण ५५ महामंडळे आहेत.
- त्यापैकी ३५ महामंडळांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे.
- त्यामुळे सरकारला या महामंडळांचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
- काही महामंडळांची स्थिती इतकी वाईट आहे की त्यांना कधीही टाळे लागू शकते.
- एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण केलं तर या महामंडळांकडूनही विलीनीकरणाची मागणी जोर धरेल.
- त्यामुळे सरकारसाठी ही डोकेदुखी ठरू शकते.
- त्यातही आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील आदींची संख्या राज्यात अधिक आहे.
- त्यांचीही आंदोलने उभी राहू शकतात.
- एसटी महामंडळाचं विलीनीकरण होऊ शकतं तर आमचं का नाही? असा युक्तिवाद कोर्टात केला जाऊ शकतो.
- त्यामुळेही राज्य सरकार विलीनीकरणाची मागणी सोडून एसटी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्यातील काही महामंडळे
- महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
- महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ
- महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ
- महाराष्ट्र शहर औद्योगिक विकास महामंडळ
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि.
- महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
- महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्या.
- हाफकीन बायो-फार्मास्युटीकल महामंडळ मर्या.
- हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था
- तापी पाटबंधारे विकास महामंडळ
- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
- महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ
- इतर मागासवर्ग विकास महामंडळ
- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.
- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित
- महाराष्ट्र वखार महामंडळ मर्या.
- महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या.
- महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.
- महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्या.
- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
- मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
- महिला आर्थिक विकास महामंडळ मर्या.
- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन २०१०
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ.
- महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ.
राज्य सरकारच्या अख्यतारीतील मंडळे
- महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ
- महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ
- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ
- महाराष्ट्र ज्ञान महामंडळ
- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ