मुक्तपीठ टीम
यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात आहे. पण यात आनंद न मानता पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करावी लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी यावर्षी भारतातून १२१ देशात साखर निर्यात करण्यात आली असून असे कधी झाले नसल्याचे सांगितले.
उसाच्या तोडणीचे नियोजन लागवडीपासून करावे लागेल…
- यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात आहे. पण यात आनंद न मानता पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करावी लागेल.
- तज्ञांच्या अंदाजानुसार यावर्षीपेक्षा पुढील वर्षी उसाचे लागवड क्षेत्र आणखी वाढेल.
- त्यामुळे उसाच्या तोडणीचे नियोजन लागवड पासून करावे लागेल.
- यावेळेस पाणी आणि पाऊस समाधानकारक असणार आहे.
- त्यामुळे उसाचे उत्पादन आणखी वाढेल.
- यावेळेस विक्रमी साखर निर्यातीला संधी आहे.
साखरेची निर्यात तीन लाख टनावर आली…
- अफगाणिस्तान हा साखरेचा मोठा ग्राहक आहे.
- मात्र तिथली परिस्थिती बदलल्याने तिथली १३ लाख टन साखरेची निर्यात तीन लाख टनावर आली.
- सौर उर्जेची गरज आहे.
- सौर उर्जेच्या क्षेत्रातील कंपन्यांनी राज्यातील साखर कारखान्यांची गोडाऊन्स आणि बाधकामांवर सोलर पॅनल बसवण्याची तयारी दर्शविली आहे.
- या कंपन्यांच्या मागणीवर आम्ही विचार करतो आहोत.
- साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि साखर आयुक्तालयाकडून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
उस विकास योजना राबविण्याची गरज!
- आपल्या राज्यात उस वगळून इतर पिकाला हमीभाव मिळत नाही.
- त्यामुळेच शेतकरी उसाकडे वळतात.
- त्यात चुकीचे नाही.
- मात्र उस पिकवताना प्रती एकरी उत्पादन वाढविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- त्यासाठी प्रत्येक कारखान्याने उस विकास योजना राबविण्याची गरज आहे.