Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भाजपा प्रवक्त्यांचा बेतालपणा, मुस्लिम दंगलखोरांचा उन्माद, पोलिसांचा निष्काळजीपणा!”

राष्ट्रपती-पंतप्रधानांच्या दौऱ्याच्यावेळी कानपुरातील हिंसाचाराची कारणं

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kanpur violence

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशच्या कानपुरात धक्कादायक प्रकार घडला आहे. कानपुरात एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. या वादात दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. सामान्य माणसं आणि पोलीसही जखमी झाले. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले. त्यांना हिंदू समाजातील एका गटानं प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे काही किमी अंतरावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी एका समारंभात असताना हे सारं घडलं. या हिंसाचाराचं मूळ भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बेताल वक्तव्यात दडलं आहे. त्याचा फायदा घेत मुस्लीम समाजातील एका गटानं शस्त्र, दगड वापरत उन्माद दाखवला. त्याचवेळी पोलिसांनी योग्य नियोजन वेळेत न केल्यामुळे त्या दंगलखोरांचं फावलं.

वरिष्ठांकडून योग्य नियोजन नसल्यामुळे घटनास्थळी कमी पोलीस होते. तरीही त्या पोलिसांनी या दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केला. त्यामुळं कानपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. तरीही पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. या दंगलीत ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

  • भाजपा प्रवक्ते नूपुर शर्मा यांनी अल्पसंख्याक समुदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
  • त्यामुळं काल मुस्लिम समुदायाच्या एका गटाने नमाज झाल्यानंतर दुकान बंद करण्याची घोषणा केली होती.
  • त्यामुळं आज या गटाने दुकाने बंद करायला सुरुवात केली, परंतु दुसऱ्या धर्माच्या एका गटाने दुकाने बंद करायला विरोध केला.
  • त्यामुळं हा वाद उफाळून आला.

दोन गटात तुफान दगडफेक!

  • कानपूरच्या परेड चौकावर शुक्रवारच्या नमाज झाल्यानंतर बाजार बंद करण्यासाठी निघालेल्या मुस्लिम समाजाच्या एका गटाने दगडफेक केली आहे.
  • त्यावेळी हिंदू समाजाच्या दुसऱ्या गटाने त्यांच्यावर दगडफेक केली.
  • या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत.
  • तर पोलिसांनी या दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला.
  • परंतु त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली आहे.
  • त्यामुळं कानपुरात तणावाचं वातवरण निर्माण झालं.
  • या तणावादरम्यान पोलिसांनी दोन्ही गटाच्या लोकांवर लाठीमार केला.
  • तर हिंसक जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही केला.
  • सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

राष्ट्रपती-पंतप्रधान असतानाही पोलिसांचा निष्काळजीपणा!

  • दंगलीच्या वेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद येथून ५० किमी अंतरावर असलेल्या कानपूर ग्रामीण भागातील पारौंख गावात उपस्थित होते.
  • त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते.
  • या व्हीव्हीआयपी संचलनामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
  • बाजार बंद पुकारला गेला तेव्हा तेथे एका एसीपीसह आठ ते दहा पोलीसच रस्त्यावर हजर होते.
  • पण जमाव हजारोंच्या संख्येत गेला.
  • गदारोळ सुरू झाल्यावर या पोलिसांनी हल्लेखोरांवर लाठीमार केला.
  • तेथून हल्लेखोर पळून गेले आणि काही मिनिटांतच हजारो लोकांसह पुन्हा आले आणि गोंधळ वाढला.
  • गर्दी जमली असताना पोलीस दलाला का पाचारण करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags: BJP spokespersonBJP spokesperson Nupur SharmaKanpur violencemuktpeethMuslim riotersPresidentprime minister narendra modiकानपूर हिंसाचारपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपा प्रवक्तेभाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मामुक्तपीठमुस्लिम दंगलखोरराष्ट्रपती
Previous Post

साखरेचं सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात, पण पुढच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करा – शरद पवार

Next Post

पुणतांबा शेतकरी आंदोलन: कृषिमंत्री दादाजी भुसेंशी चर्चेनंतर आंदोलन स्थगित

Next Post
Dadaji Bhuse Puntamba

पुणतांबा शेतकरी आंदोलन: कृषिमंत्री दादाजी भुसेंशी चर्चेनंतर आंदोलन स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!