Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवारांचा आवाज काढून फसवणूक! पुण्याच्या भामट्यांचा बदली आणि कर्जवसुलीचा प्रयत्न!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

आवाज कुणाचा…ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच दुमदुमते आणि त्या त्या पक्षांच्या प्रभावानुसार प्रतिसादही मिळवते. पण काही वेळा अशा घोषणा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांचे बनावट आवाज काढून फसवणुकीच्याही घटना घडत असतात. ताजी घटना आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात बोलून फसवणूक करण्याच्या भामटेगिरीची. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना बदलीसाठी तर पुण्यातील एक कर्जदाराला कर्जवसुलीसाठी शरद पवार यांच्या आवाज काढण्यात आला. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे फोन नंबरही समोरच्या माणसांकडे शरद पवार यांच्या वापरातीलच असावेत, अशी क्लुप्तीही करण्यात आली.

 

मंत्रालयात बदलीसाठी पवारांच्या आवाजात फोन

  • विकास गुरव आणि किरण काकडे दोघेही पुण्यातील रहिवाशी आहेत.
  • ते सध्या बेरोजगार आहेत.
  • आरोपी विकास गुरव शरद पवारांच्या आवाजात बोलला आहे.
  • तर किरण काकडे याने पवारांचा पीए असल्याचं भासवले.
  • आपण शरद पवार बोलत असून एका अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा, असे फर्मान अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंग यांना सोडले होते.
  • त्यावेळी आपण सिल्व्हर ओकवरून बोलत असल्याचे आरोपीने म्हटले होते.
  • मात्र, शरद पवार त्यावेळी दिल्लीत होते.
  • दरम्यान, अधिकाऱ्यांना संशय आला आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
  • त्यावेळी पोलिसांनी तपास करून या सगळ्या प्रकाराचा छडा लावला.

 

पुण्यातही कर्जवसुलीसाठी भामेटेगिरी!

  • पुण्यातील चाकणमध्येही असाच एक प्रकार घडला आहे.
  • शरद पवार यांच्या आवाजात फोन करत प्रतापराव वामन खंडेभरड यांच्याकडे पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या चाकणमध्ये घडला आहे.
  • याप्रकरणी प्रतापराव वामन खांडेभराड यांनी याबाबत चाकण पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
  • धीरज पठारे, किरण काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

नेमकं काय कारण?

  • प्रताप खांडेभरड यांनी २०१४ मध्ये धीरज पठारेकडून कर्ज घेतले होते.
  • त्या साठी खांडेभराड यांनी पठारे यांना १३ एकर जमीन दिली होतो.
  • मात्र चक्रवाढ व्याज लावल्याने रक्कम वाढतच होती.
  • त्यानंतरही आरोपीने पैसे देण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे तगादा लावला.
  • फिर्यादी, त्यांच्या पत्नी आणि मेहुण्याला आरोपी धीरज याने वारंवार फोन करून धमकी दिली.
  • पैसे देत नाही म्हणून आरोपींनी ९ ऑगस्ट रोजी शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून ‘धीरज पठारे याचे पैसे देऊन टाक. प्रकरण संपवून टाक.’ अशा आशयाचा फोन केला.
  • मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.
  • त्यांना २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
  • मुंबई पोलिसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी धीरज याला पिंपरी-चिंचवड पोलीस चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करून घेणार आहेत.

 

शरद पवारांचा आवाज आणि फोन नंबरही! समजून घ्या भामटेगिरीचं तंत्रज्ञान…कसा कराल बचाव?


Tags: Maharashtramumbai policeNCPncp president sharad pawarमुंबई पोलीसराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

“नायगाव बीडीडी चाळीतील सर्व पात्र लाभार्थींना ५०० चौरस फुटांची सदनिका देणार”

Next Post

राज्यात आघाडी, नागपुरात युती! बुटीबोरीत शिवसेना भाजपाचा वेगळाच सत्ता पॅटर्न!!

Next Post
bjp & sena

राज्यात आघाडी, नागपुरात युती! बुटीबोरीत शिवसेना भाजपाचा वेगळाच सत्ता पॅटर्न!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!