Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवारांचा आवाज आणि फोन नंबरही! समजून घ्या भामटेगिरीचं तंत्रज्ञान…कसा कराल बचाव?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad pawar

मुक्तपीठ टीम

कर्जवसुली आणि बदलीसाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात बोलून फसवणुकीचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. विकास गुरव आणि किरण काकडे अशी या आरोपींची नाव आहेत. शरद पवारांच्या आवजात मंत्रालयात आलेल्या फोनवरून आणि चाकणमध्ये घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

आवाज तर आवाज नंबरही तोच कसा?

  • एखाद्या व्यक्तीचा हुबेहुब आवाज काढणं अनेकांना जमतं.
  • मिमिक्री करणारे कलाकार असे अनेकांचे आवाज काढतात.
  • मनोरंजनाच्या चांगल्या उद्देशाने त्याचा वापर करतात.
  • काही लोक त्या कौशल्याचा गैरवापर करतात.
  • पण या प्रकरणातील आरोपींनी केवळ आवाजच काढला नाही तर नंबरही शरद पवार यांच्या वापरातील असल्याचे भासवले.
  • त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध काही बेकायदा सेवांचा वापर केला असावा.
  • अशा सेवा पुरवणाऱ्या वेबसाइटवर शुल्क भरून कोणालाही कॉल करताना आपल्याला जो नंबर समोरच्याला दिसला पाहिजे तो दाखवता येतो.
  • या आरोपींनी शरद पवार यांच्या नावाने भामटेगिरी करताना हीच क्लुप्ती वापरली असण्याची शक्यता आहे.

 

आवाजाचं नकल कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या फसवणुकीपासून कसे वाचाल?

  • मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे ही भामटेगिरी उघड झाली.
  • शरद पवार हे कोणाच्या बदलीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात फोन करणार नाहीत, ते दिल्लीत आहेत, त्यामुळे मुंबईच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरून कॉल करूच शकत नाही, हे लक्षात घेत अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगली.
  • त्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर फोन करून खात्री केली, तेव्हा तेथून फोनच केला नसल्याचे उघड झाले.
  • आवाज नकलेचे कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा गैरवापर करून कोणीही कोणाला फसवू शकतं. त्यामुळे कधीही अशा संशयास्पद कॉलला बळी पडू नका.
  • कोणाच्याही नावाने असे कॉल आले तर संबंधित व्यक्तीकडे पडताळणी करा.

 

शरद पवारांचा आवाज काढून फसवणूक! पुण्याच्या भामट्यांचा बदली आणि कर्जवसुलीचा प्रयत्न!


Tags: chief minister uddhav thackeraymumbaiNCPncp president sharad pawarमंत्रालयमुख्यमंत्री कार्यालयमुंबईमुंबई गुन्हे शाखाविकास गुरव आणि किरण काकडेशरद पवार
Previous Post

राज्यात आघाडी, नागपुरात युती! बुटीबोरीत शिवसेना भाजपाचा वेगळाच सत्ता पॅटर्न!!

Next Post

यंदा शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्क्यांची कपात, शासन निर्णय जाहीर

Next Post
School

यंदा शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्क्यांची कपात, शासन निर्णय जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!