मुक्तपीठ टीम
आवाज कुणाचा…ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच दुमदुमते आणि त्या त्या पक्षांच्या प्रभावानुसार प्रतिसादही मिळवते. पण काही वेळा अशा घोषणा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांचे बनावट आवाज काढून फसवणुकीच्याही घटना घडत असतात. ताजी घटना आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात बोलून फसवणूक करण्याच्या भामटेगिरीची. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना बदलीसाठी तर पुण्यातील एक कर्जदाराला कर्जवसुलीसाठी शरद पवार यांच्या आवाज काढण्यात आला. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे फोन नंबरही समोरच्या माणसांकडे शरद पवार यांच्या वापरातीलच असावेत, अशी क्लुप्तीही करण्यात आली.
मंत्रालयात बदलीसाठी पवारांच्या आवाजात फोन
- विकास गुरव आणि किरण काकडे दोघेही पुण्यातील रहिवाशी आहेत.
- ते सध्या बेरोजगार आहेत.
- आरोपी विकास गुरव शरद पवारांच्या आवाजात बोलला आहे.
- तर किरण काकडे याने पवारांचा पीए असल्याचं भासवले.
- आपण शरद पवार बोलत असून एका अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा, असे फर्मान अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंग यांना सोडले होते.
- त्यावेळी आपण सिल्व्हर ओकवरून बोलत असल्याचे आरोपीने म्हटले होते.
- मात्र, शरद पवार त्यावेळी दिल्लीत होते.
- दरम्यान, अधिकाऱ्यांना संशय आला आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
- त्यावेळी पोलिसांनी तपास करून या सगळ्या प्रकाराचा छडा लावला.
पुण्यातही कर्जवसुलीसाठी भामेटेगिरी!
- पुण्यातील चाकणमध्येही असाच एक प्रकार घडला आहे.
- शरद पवार यांच्या आवाजात फोन करत प्रतापराव वामन खंडेभरड यांच्याकडे पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या चाकणमध्ये घडला आहे.
- याप्रकरणी प्रतापराव वामन खांडेभराड यांनी याबाबत चाकण पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
- धीरज पठारे, किरण काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं काय कारण?
- प्रताप खांडेभरड यांनी २०१४ मध्ये धीरज पठारेकडून कर्ज घेतले होते.
- त्या साठी खांडेभराड यांनी पठारे यांना १३ एकर जमीन दिली होतो.
- मात्र चक्रवाढ व्याज लावल्याने रक्कम वाढतच होती.
- त्यानंतरही आरोपीने पैसे देण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे तगादा लावला.
- फिर्यादी, त्यांच्या पत्नी आणि मेहुण्याला आरोपी धीरज याने वारंवार फोन करून धमकी दिली.
- पैसे देत नाही म्हणून आरोपींनी ९ ऑगस्ट रोजी शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून ‘धीरज पठारे याचे पैसे देऊन टाक. प्रकरण संपवून टाक.’ अशा आशयाचा फोन केला.
- मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.
- त्यांना २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- मुंबई पोलिसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी धीरज याला पिंपरी-चिंचवड पोलीस चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करून घेणार आहेत.
शरद पवारांचा आवाज आणि फोन नंबरही! समजून घ्या भामटेगिरीचं तंत्रज्ञान…कसा कराल बचाव?