Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?” पवारांनी उलगडला घटनाक्रम, फडणवीसांना आठवले महाभारत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharad pawar -fadanvis

मुक्तपीठ टीम

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारचे नेतृत्व हे शिवसेनेकडे आहे. दरम्यान सरकारनच्या स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार पाडलेली भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हात मी सक्तीने वर केला. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली, असे शरद पवार यांनी सांगितले. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत शरद पवार आणि आघाडी सरकारवर टीका केली आहे.

 

देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट

“द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.

 

द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?

साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2021

 

काय म्हणाले शरद पवार?

  • शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत म्हणाले होते की, “मी मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण ऐकलं.
  • त्या भाषणात त्यांनी काय भूमिका मांडायची ती मांडली.
  • त्यानंतर त्यावर आज माजी मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावरील त्यांची मतं मांडली.
  • त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, काही करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं.
  • मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, हे जे आघाडीचं सरकार झालं.
  • ते सरकार बनवण्यामध्ये आमच्या काही सहकाऱ्यांचा हात होता, त्यात माझाही किंचित होता.
  • माझाही त्यात सहभाग होता.
  • मी ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली.
  • त्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचं, यासंबंधी दोन-तीन नावं आमच्याकडे आलेली होती.
  • उद्धव ठाकरे ही बाब मान्य करायला तयार नव्हते.
  • ते माझ्या शेजारी बसले होते.
  • शेवटी विचारलं काय करायचं? कुणाला करायचं? उद्धव ठाकरेंचा हात मी हातात धरला आणि तो हात मी वर केला आणि सांगितलं हेच होतील.
  • त्यांची त्या ठिकाणी हात वर करायची तयारी नव्हती, त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी नव्हती.
  • त्यांना अक्षरश: सक्तीने मी हात वर करायला लावला.
  • आणि नंतर त्यांनी सांगितलं, ही गोष्ट सत्य आहे की त्यांचे वडील आणि मी सहकारी होतो.
  • म्हणजे या लोकांना मी लहानपणापासून पाहिलेलं आहे.
    बाळासाहेब माझे मित्र होते.
  • बाळासाहेबांचे आणि माझे राजकीय मतभेद असायचे, पण व्यक्तिगत सलोखा हा अत्यंत जवळचा होता.
  • बाळासाहेब एक दिलदार असे गृहस्थ होते.
  • त्यामुळे या गृहस्थाने महाराष्ट्रासाठी काही योगदान दिलं, म्हणजे बाळासाहेबांनी त्यांच्या संघटनेने.
  • आणि ज्यावेळी सरकार बनवण्याचा प्रसंग आला.
  • त्यावेळे तीन पक्षांमध्ये सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्या पक्षाचे होते, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा नेता करण्याचं ठरल्यानंतर आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला आपण भाग पाडावं, असा माझा आग्रह होता.
  • माझा आग्रह असल्याने मी सक्तीने त्यांचा हात वर केला.
  • सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं आणि त्यांची त्या ठिकाणी निवड झाली.”

 

पूर्ण पाच वर्षे मविआचे नेतृत्व शिवसेनेकडेच! शरद पवारांनी अजित पवारांच्या प्रमोशनवर फुली मारली!!


Tags: chief minister uddhav thackeraydevendra fadanvisMaharashtrancp president sharad pawarदेवेंद्र फडणवीसशरद पवारशिवसेना
Previous Post

एनसीबीच्या समीर वानखेडेंना शाहरुखच्या मुलाचा शब्द, “…एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल!”

Next Post

पूर्ण पाच वर्षे मविआचे नेतृत्व शिवसेनेकडेच! शरद पवारांनी अजित पवारांच्या प्रमोशनवर फुली मारली!!

Next Post
sharad pawar

पूर्ण पाच वर्षे मविआचे नेतृत्व शिवसेनेकडेच! शरद पवारांनी अजित पवारांच्या प्रमोशनवर फुली मारली!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!