Friday, October 2, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रयोगशील शेतकऱ्यांचा अभिनव प्रयोग…जुन्या मोटरसायकलपासून ट्रॉली गाडी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
gnm 1

मुक्तपीठ टीम

मराठी माणूस ठरवलं तर जिद्दीनं आपल्याच मातीत स्वर्ग उभारू शकतो. तुम्ही कधी पालघरला गेलात तर घोलवडमध्ये वसलेल्या ‘तारपा अ‍ॅग्रो-इको टूरिझम’ या सेव्ह फार्मच्या उपक्रमाला नक्की भेट द्या. ‘तारपा’ हा शब्द स्थानिक आदिवासी समुदायाद्वारे ‘वारली’ या नावाने वापरल्या जाणार्‍या वाद्यपासून आला आहे. तारपा विकसित करणाऱ्या सावे कुटुंबानं शेती, फळबागांमधील वेगळ्या प्रयोगांबरोबरच इतरही अनेक वेगळे अभिनव प्रयोग केले आहेत. सध्याचा हा नवा प्रयोग व्हायरल व्हिडीओंमुळे कौतुकाचा विषय झाला आहे.

 

व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडीओत दिसते हिरव्यागार परिसरातून थाटात येणारी गाडी. चालणारे प्रभाकर सावे. पालघर जिल्ह्यातील घोलवडच्या तारपा अ‍ॅग्रो-इको टूरिझमचे प्रणेते. प्रभाकर सावे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य सावे यांना लॉकडाऊनमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली चालवणारे मिळत नव्हते. त्यांच्या ३५ एकरांच्या परिसरात पिकलेली फळे, इतर शेतीमाल, नर्सरीची रोपे विक्री केंद्रावर आणण्याची समस्या निर्माण झाली. तेव्हा त्यांनी डोकं लढवलं. घरातील १५ वर्षे जुनी वापरात नसलेली बजाज पल्सर मोटर सायकलीला सुरुवातीला स्कुटरची चाके लावून ही ट्रॉली गाडी तयार केली. त्यानंतर मोटर सायकलीची चाके वापरून तिची क्षमता वाढवली. व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडीओत ती गाडी दिसते. आज त्यांच्या या मोटर सायकल गाडीमुळे अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. गाडी जुनी झाली. भंगारात काढू नका. तिला दुरुस्त करा. ट्रॉली जोडा. आपल्या परिसरात वाहतुकीसाठी वापरा.

 

आपली माती, आपलं तारपा

  • त्यांच्या शब्दात सांगायचे तर शेती पर्यटन संकल्पना शेतकरी व निसर्गप्रेमी शहरी लोकांमध्ये लोकप्रिय करण्या हे आमचे उद्दीष्ट आहे.
  • आम्ही आमच्या अतिथींना शाश्वत सेंद्रिय शेती पद्धती, श्रीमंत आदिवासी संस्कृती आणि ग्रामीण जीवन या सर्वांचा परिचय करून देत आहोत, त्या सर्व गोष्टी फक्त भारतीय ग्रामीण भागात आढळतात.
  • ‘तारपा’ हे पारंपरिक हॉटेल किंवा रिसॉर्ट नाही तर हे असे पर्यटन स्थळ आहे जिथे एखादे पर्यटन ‘अनुभव’ घेता येते!

 

तारपाच्या सावे फार्मच्या वेबसाइटवरून, शेताच्या आभासी सहलीचा अनुभव घेता येऊ शकतो. आपणास येथे होणार्‍या विविध शेती व पर्यटन कार्याची झलक मिळू शकेल. त्यानंतर नक्कीच तुम्हीही ठरवालच सावे फार्मला भेट द्यायचीच द्यायची.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Aditya Savebike trollyPalgharPrabhakar Saveआदित्य सावेट्रॅक्टर ट्रॉलीतारपा अ‍ॅग्रो-इको टूरिझमपालघरप्रभाकर सावे
Previous Post

राज्यात साडे आठ हजार नवे रुग्ण, ६ हजार घरी परतले! ४८ तासात ११८ मृत्यू!

Next Post

शेफाली वर्माची दुहेरी कामगिरी, आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटर आणि दहावी पास!

Next Post
shafali verma

शेफाली वर्माची दुहेरी कामगिरी, आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटर आणि दहावी पास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!