Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विविध क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनतर्फे सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Service Appreciation Award by Parbhanna Foundation to the servicemen

मुक्तपीठ टीम

“सामाजिक, आर्थिक विकास होण्यासाठी चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रगतीपथावर जायचे असेल, तर पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड द्यायला हवी. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा,” असे मत पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील रेडेकर यांनी व्यक्त केले.

विविध क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने सेवाकार्य कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला लोकशाही संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे पी. आर. सोनवणे, कर्वे सामाजिक संस्थेतील सीएसआर विभागाचे संचालक प्रा. डॉ. महेश ठाकूर, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे (आरोग्य), शेतकरी युवानेता कैलास येसगे (कृषी), मधुबन कृषी पर्यटनाचे तृनीत कुथे (पर्यटन), पत्रकार रामचंद्र भंडारवार (पत्रकारिता), पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रशांत कांबळे (प्रशासन), उद्योजक तिलोकराज भालेराव (उद्योजकता), राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे (राजकारण), अभिनेता कपिल कांबळे (सांस्कृतिक), राईट टू लव्हचे के. अभिजित (सामाजिक), अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले (शैक्षणिक), लेखक व पर्यावरण अभ्यासक बसवंत विठाबाई बाबाराव (पर्यावरण) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुनील रेडेकर म्हणाले, “पुणे विद्यार्थी गृहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब, गरजू व होतकरू मुलांना शिक्षण देऊन घडविले जाते. ११३ वर्षांचा हा ज्ञानदानाचा हा वारसा पुढे नेत आहोत. शिक्षणच आपल्याला तारणार असून, त्याला मूल्यांची व संस्कारांची जोड मिळाली, तर भारतातील तरुण पिढी आणखी प्रगती करू शकेल.”

पी. आर. सोनावणे म्हणाले, “भारतीय संविधानाने आपल्याला न्याय व सन्मानाने जगण्याचा अधिकार दिले आहेत. त्याचबरोबर काही कर्तव्येही सांगितली आहेत. संविधान अबाधित ठेवण्याचे प्रत्येकाचे दायित्व आहे. या देशातील आदिवासींना, मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणून प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची संधी संविधानाने दिली आहे.”

आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो, तरी आपल्यातील सामाजिक बंधुभाव जपायला हवा. समाजाच्या समस्या सोडवण्यात माझे काय योगदान असू शकेल, असा विचार करून प्रत्येकाने काम केल्यास अनेक प्रश्न सुटतील, असे प्रा. डॉ. महेश ठाकूर म्हणाले.


Previous Post

कुटुंब नियोजनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताला एक्सलन्स इन लीडरशिप इन फॅमिली प्लॅनिंग EXCELL पुरस्कार

Next Post

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात वैद्यकीय पदांवर ०८ जागांसाठी करिअर संधी

Next Post
khadki

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात वैद्यकीय पदांवर ०८ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!