मुक्तपीठ टीम
प्रत्येकालाच कधीना कधी हा प्रश्न पडला असेल की, पृथ्वीवर पाणी कसे आले? मानव प्रजाती कशी निर्माण झाली असेल. यावर सध्या एक महत्त्वाचे संशोधन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जपानी शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला आहे. लघुग्रहाने पृथ्वीवर पाणी आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.
‘रयुगु’ नावाच्या लघुग्रहावरील धुळीचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ‘रयुगु’ हा लघुग्रह ८०० मीटर व्यासाचा दगड आहे. आपण अनेकदा म्हणतो की अमूततमूक गावागावांचं पाणी प्यायला आहे, तसंच आता पृथ्वीवरील पाणी हे ग्रहांग्रहांवरचं आहे, असं म्हटलं जाईल!
‘रयुगु’ लघुग्रहाविषयीची सविस्तर माहिती
- ‘रयुगु’ या दगडातील नमुने पृथ्वीवर आणले गेले आहेत.
- त्यांच्यामध्ये हिरव्या रंगाचे सेंद्रिय पदार्थ आढळतात.
- हे पदार्थ छिद्रांनी भरलेले आहे. त्यात असलेल्या छिद्रांवरून असे दिसून येते की त्यातून पाणी किंवा वायू वाहत असावा.
- याचा अर्थ असा की, ४५० दशलक्ष वर्षांपूर्वी ‘रयुगु’ वर जीवनाची चिन्हे होती. ही चिन्हे आजही शक्य आहेत.
- अंतराळ मोहिमेअंतर्गत या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी जपानने हायाबुसा-२ हे अंतराळयान पाठवले होते.
- २०२० मध्ये ते ‘रयुगु’ लघुग्रहामधील मातीचे नमुने घेऊन परतले. गेल्या वर्षी असाही दावा करण्यात आला होता की, रयुगुवर प्राचीन मूलद्रव्ये सापडली आहेत.
इतर अभ्यासामार्फत मिळालेले पुरावे
- दुसऱ्या अभ्यासात असे दिसून आले आहे की हे मूलद्रव्य मातीसारख्या पदार्थापासून तयार झाले आहे. म्हणजेच सेंद्रिय उत्पत्तीचा पदार्थ आहे.
- या मातीत जीवसृष्टीची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे.
- पॅरिस-सॅकले युनिव्हर्सिटीने याचा अभ्यास केला. त्यांच्या टीमला या पदार्थात कार्बोनेट आणि ज्वलनशील मिश्रणही सापडले.
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनीही या मातीच्या नमुन्यांचा अभ्यास केला आहे. त्यांनी सांगितले की, मिळालेल्या नमुन्यांची माती इतकी काळी आहे की ती फक्त २ टक्के सूर्यप्रकाश परावर्तित करते. हा कार्बनचा एक विशिष्ट प्रकार आहे. ‘रयुगु’ लघुग्रह हा पृथ्वी आणि मंगळाच्या दरम्यानच्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरतो.