Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोतर्फे ४१५८ सदनिकांसह २४५ वाणिज्यिक गाळे आणि ६ कार्यालये विक्रीची योजना

नोंदणीची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२२– त्वरा करा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
cidco

मुक्तपीठ टीम

सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध ४,१५८ घरांसोबतच २४५ वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलांतील ६ कार्यालये (कमर्शियल प्रीमाईसेस) विक्रीच्या योजना सिडको महामंडळातर्फे सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी व व्यावसायिकांना या योजनांच्या माध्यमातून सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

महागृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील ४,१५८ घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या दरातील या ४,१५८ घरांपैकी ४०४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित ३,७५४ घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा रू. ६,००,००० तर अनुदानाची रक्कम रू. २,५०,००० निश्चित करण्यात आली आहे. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी सदर घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत. या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाच्या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इ. सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध आहेत.

या सोबतच सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण २४५ वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण ६ कार्यालये (कमर्शिअल प्रीमाईसेस) विक्रीकरिता उपलब्ध आहेत.

या योजनांद्वारे समाजातील सर्व घटकांना सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. ज्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात मदत होण्यासोबतच नवी मुंबईच्या वाणिज्यिक क्षमता वृद्धिंगत होऊन शहराच्या आर्थिक विकासासही हातभार लागणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी व व्यावसायिकांना विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. नागरीक, व्यापारी व व्यावसायिकांनी लवकरात लवकर या योजनांचा लाभ घ्यावा व आपले घराचे आणि व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.

उपरोक्त योजनांच्या सविस्तर माहितीकरिता https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून अर्ज नोंदणीपासून ते सोडती पर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पार पडणार आहेत. योजनांसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता अर्जदारांनी या संकेतस्थळास भेट द्यावी.

 

पाहा:


Tags: CIDCOCIDCO SadanikaCommercial Real Estategood newsmuktpeethOffice Saleकार्यालय विक्रीघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठवाणिज्यिक गाळेसिडकोसिडको सदनिका
Previous Post

मुंबईतील प्रसिद्ध माउंट मेरी जत्रेला सुरुवात, शंभर वर्षांची परंपरा! जाणून घ्या जत्रा आणि वांद्रे पर्यटनाविषयी सर्व काही…

Next Post

पुण्याच्या लायन्स क्लबतर्फे पोलिसांचा उत्साह आणि ऊर्जा वाढवणारं पौष्टिक जेवण

Next Post
pune police

पुण्याच्या लायन्स क्लबतर्फे पोलिसांचा उत्साह आणि ऊर्जा वाढवणारं पौष्टिक जेवण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!