Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील प्रसिद्ध माउंट मेरी जत्रेला सुरुवात, शंभर वर्षांची परंपरा! जाणून घ्या जत्रा आणि वांद्रे पर्यटनाविषयी सर्व काही…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Mount Mary Fair

मुक्तपीठ टीम

मुंबईतील प्रसिद्ध माउंट मेरी जत्रा सुरु झाली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या जत्रेला शंभर वर्षांपेक्षा मोठी परंपरा आहे. कोरोना संकटात थांबलेली ही परंपरा आता पुन्हा दणक्यात साजरी होतेय. मुंबईतूनच नाही तर आसपासच्या परिसरातूनही लाखोंच्या संख्येनं श्रद्धाळू या जत्रेला भेट देतात. परिसरातील वांद्रे महोत्सव म्हणजेच Bandra Fest अनुभवतात. गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात या जत्रेची खास बातमी सादर करतेय मी अपेक्षा सकपाळ.

वांद्रे पश्चिम परिसरात वसलेल्या ‘बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट’ हे जुने चर्च आहे. या चर्चलाच माउंट मेरी चर्च म्हणूनही ओळखले जाते. मुंबईतील जुन्या चर्चेपैकी एक असणाऱ्या या चर्चची वास्तू रचनाही वास्तूची आवड असणाऱ्या अभ्यासकांनाही आकर्षित करते. हे चर्च खूप मोठे आहे. खास बाब म्हणजे आजही ते तसेच जतन करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्र आहेच, पण अभ्यासकांनाही तिथं आल्यावर जुन्या काळातील वास्तूंचे चांगल्या अवस्थेतील दर्शन घेत अभ्यास करता येतो.

चर्चमधील मदर मेरी मनोकामना पूर्ण करते अशी अनेकांची श्रद्धा असते. तेथे मेणाने बनवलेले शारीरिक अवयव अर्पण करण्याची परंपरा आहे. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात माऊंट मेरी जत्रा भरते. चर्चच्या परिसरात साजऱ्या होणाऱ्या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी श्रद्धाळूंप्रमाणे इतरही लोक येतात.

या चर्चचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते समुद्रसपाटीपासून ८० मीटर उंचीवर वसलेले आहे. या चर्चच्या परिसरातून मुंबई शेजारील अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येते. हे चर्च जेथे आहे तो वांद्रे पश्चिम परिसर मुंबईच्या पॉश भागांपैकी एक आहे. तसेच त्यापासून काही अंतरावरच बँडस्टँड आणि कार्टर रोड अशी विविध प्रेक्षणीय स्थळंही आहेत. चित्रपट अभिनेत शाहरुख खान, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अशा सेलिब्रिटींची घरं देखील वांद्रे समुद्र किनाऱ्याचा परिसराला एक वेगळं ग्लॅमर आहे. तसेच स्ट्रिट शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेली लिंकिंग रोडची फॅशन मार्केटही याच भागात आहे. वांद्रे येथील नॅशनल लायब्ररी ही जुनी संस्था, वांद्रे तलाव आणि खवैयांसाठी हिल रोड भागात अनेक फुड जॉइंट्स आहेतच. वांद्रे तलावाच्या रेल्वे स्थानकाजवळील भागात असलेले खूप जुने होम मेड आइस्क्रिम आणि फालुद्याचे दुकान तर न चुकवावे असेच!
आणि हो घरी परताना तुम्ही लोकल ट्रेनने जाणार असाल तर चांगलंच पण जर रस्त्याने जाणार असाल तरीही या फालुद्याचा आस्वाद घेतल्यानंतर वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकालाही भेट द्या. कारण हे रेल्वे स्थानकही एक हेरिटेजच आहे. जतन केल्यानंतर प्रेक्षणीय ठरलेलं. तर मग वाट कसली पाहाताय…चला तर वांद्र्याला…माऊंट मेरी जत्रेला!

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे जत्रेसाठी केलेली व्यवस्था

  • परिसरातील रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती
  • भाविकांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था
  • कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे करावी यासाठी स्वच्छतेची खास व्यवस्था
  • गर्दी लक्षात घेत फिरत्या शौचालयांची व्यवस्था
  • प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधा
  • शंभरपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे
  • देखरेख कक्ष आणि निरीक्षण मनोरा
  • २४ तास नियंत्रण कक्ष

पाहा:


Tags: Bandragood newsHundred Years of TraditionMount Mary Fairmuktpeethmumbaiघडलं-बिघडलंचांगली बातमीमाउंट मेरी जत्रामुक्तपीठमुंबईवांद्रेशंभर वर्ष परंपरा
Previous Post

अजित पवार म्हणतात उगाच वेगळा अर्थ काढला! माझं एकट्याचंच भाषण नाही झालं, असं नाही!

Next Post

सिडकोतर्फे ४१५८ सदनिकांसह २४५ वाणिज्यिक गाळे आणि ६ कार्यालये विक्रीची योजना

Next Post
cidco

सिडकोतर्फे ४१५८ सदनिकांसह २४५ वाणिज्यिक गाळे आणि ६ कार्यालये विक्रीची योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!