Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्याच्या लायन्स क्लबतर्फे पोलिसांचा उत्साह आणि ऊर्जा वाढवणारं पौष्टिक जेवण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
pune police

मुक्तपीठ टीम

गणेश विसर्जनावेळी सलग २५-३० तास अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम स्तुत्य आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उभारलेल्या श्रमपरिहार केंद्रामुळे आमच्या पोलीस बांधवाना घरच्यासारखे ताजे, स्वादिष्ट व पौष्टिक जेवण, स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचा, सुरक्षारक्षकांचा आणि पोलिस मित्रांचा बंदोबस्त करण्यातील उत्साह वाढेल, तसेच त्यांना ऊर्जा मिळेल. गणरायाच्या आशीर्वादाने विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडेल, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी केले.

 Pune Police

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे उभारलेल्या श्रमपरिहार केंद्राचे उद्घाटन डहाळे यांच्या हस्ते झाले. गेल्या १७ वर्षांपासून हे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात येते. याप्रसंगी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे उपप्रांतपाल (प्रथम) परमानंद शर्मा, उपप्रांतपाल (द्वितीय) सुनील चेकर, माजी प्रांतपाल फतेचंद रांका, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष अनिल सुगंधी, सचिव पूनम अष्टेकर, खजिनदार दर्शन तोडकर, उपक्रमाचे प्रमुख कल्पेश पटनी, राष्ट्रीय कला अकादमीचे सुरेश धडफळे यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 Pune Police

फत्तेचंद रांका म्हणाले, “विसर्जनाच्या दिवशी हा उपक्रम आम्ही गेल्या १७ वर्षापासून राबवत आहोत. जवळपास दीड हजार पोलिस कर्मचारी, होमगार्ड्स, पोलिस मित्र आणि रांगोळीच्या पायघडया घालणारे राष्ट्रीय कला अकादमीचे स्वयंसेवक यांना पॅकेट्समधून ताजे व पौष्टिक जेवण दिले जाते. शिवाय केंद्रावर ५०० ते ६०० लोक जेवण करतात. घरगुती तीन पोळ्या, मटकीची भाजी, पुलाव, लोणचे व बर्फी आदी पदार्थ यात असतात. शुक्रवारी सकाळी ११ ते शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ही भोजनव्यवस्था करण्यात आली आहे.”

पाहा:


Tags: good newsmuktpeethNutritious MealspunePune Lions Clubpune policeघडलं-बिघडलंचांगली बातमीपुणेपुणे पोलीसपुणे लायन्स क्लबपौष्टिक जेवणमुक्तपीठ
Previous Post

सिडकोतर्फे ४१५८ सदनिकांसह २४५ वाणिज्यिक गाळे आणि ६ कार्यालये विक्रीची योजना

Next Post

ऑडीची AudiQ7 लिमिटेड एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत…

Next Post
Audi Q7 Limited Edition

ऑडीची AudiQ7 लिमिटेड एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!