Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भूमिपुत्रांना खासगीत आरक्षण! सर्वोच्च न्यायालयाचा हरियाणाच्या ७५% आरक्षणाला हिरवा कंदिल!! महाराष्ट्र कायदा अंमलात आणणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने भूमीपुत्रांच्या खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. हरियाणाच्या भूमीपुत्रांना खासगी क्षेत्रात ७५ टक्के आरक्षण देण्याचा हरियाणा सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करत भूमीपुत्रांना दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने ३ फेब्रुवारीला हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारच्या भूमीपुत्रांना खासगी क्षेत्रात ७५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर स्थगिती आणली होती. आता हा निर्णय अंमलात आणायचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच आता महाराष्ट्रातही अस्तित्वात असलेल्या अशाच कायद्याची अंमलबजावणी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने?

  • न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि पी.एस.नरसिंहा यांच्या खंडपीठाने हरियाणा सरकारला कंपन्यांवर कठोर कारवाई न करण्याचे निर्देशही दिले आहेत.
  • तसंच उच्च न्यायालयाला ४ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

 

हरियाणा उच्च न्यायालयाचा कायद स्थगितीचा निर्णय रद्द!

  • सर्वोच्च न्यायालयात हरियाणा सरकारची सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी बाजू मांडली.
  • तसंच याचिकाकर्त्यांची बाजू मांडण्यासाठी पंजाब तसंच हरिणाया उच्च न्यायालयाच्या याचिकाकर्त्यांना सुनावणीची पुढची तारीख निश्चित करण्यासाठी कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.

 

महाराष्ट्रातही आहे कायदा…कागदावर!

  • हरियाणा सरकारने खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांसाठी ७५ टक्के आरक्षणाचा कायदा केला होता.
  • उच्च न्यायालयाकडून ३ फेब्रुवारीला कायद्याला स्थगिती मिळाली होती.
  • पंजाब तसंच हरियाणा उच्च न्यायालयाने खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये भूमीपुत्रांना ७५ टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याला अंतरिम स्थगिती दिली होती.
  • त्यामुळे हरियाणा सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
  • हायकोर्टाने फरिदाबादमधल्या विविध उद्योग समूह आणि गुडगाव, हरियाणातल्या इतर अनेक संस्थांच्या याचिकांवर सुनावणी करताना हे आदेश दिले होते.
  • महाराष्ट्रातही असाच एक कायदा आहे.
  • त्याविषयी मध्यंतरी उद्योग मंत्री सुभाष देसाईही बोलले होते.
  • पण त्या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नाही.
  • आता राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण अंमलातही आणू शकेल.

Tags: haryanaMaharashtraमहाराष्ट्रहरियाणा
Previous Post

एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर आयकर धाड! एका योगींच्या हाती रिमोट कंट्रोल!!

Next Post

महिला धोरणाच्या मसुद्यावर अधिवेशनात चर्चा व्हावी – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

Next Post
विधानभवन येथे ४थ्या महिला धोरणाच्या प्रारूपावर सुचना आणि अभिप्राय देण्यासाठी बैठक 2

महिला धोरणाच्या मसुद्यावर अधिवेशनात चर्चा व्हावी - सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!