Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर आयकर धाड! एका योगींच्या हाती रिमोट कंट्रोल!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Income tax raid on the house of former NSE CEO Chitra Ramakrishna

मुक्तपीठ टीम

आयकर विभागाने गुरुवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या मुंबईतील घरावर आयकर विभागाने धाड घातली आहे. चित्रा रामकृष्ण या अलीकडेच सेबीच्या आदेशाने चर्चेत आल्या आहेत. आदेशात म्हटले आहे की, हिमालयात राहणाऱ्या एका ‘अज्ञात योगी’च्या सांगण्यावरून चित्रा यांनी आनंद सुब्रमण्यम यांना ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून नियुक्त केले होते!

 

चित्रा रामकृष्ण, योगी आणि एनएसई!

  • आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, रामकृष्ण आणि इतरांवर करचोरी आणि आर्थिक हेराफेरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर छापे टाकण्यात आले.
  • चित्रा यांना एप्रिल २०१३ मध्ये एनएसईचे एमडी आणि सीईओ बनवण्यात आले होते.
  • डिसेंबर २०१६ पर्यंत त्या या पदावर होत्या.
  • मिळालेल्या माहितीनुसार, ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्या ठिकाणावरही छापे टाकण्यात आले आहेत.

 

रामकृष्ण यांना ३ कोटींचा दंड!

  • सेबीच्या आदेशात म्हटले आहे की, रामकृष्ण यांनी एनएसईच्या आर्थिक आणि व्यावसायिक योजनांसह काही अंतर्गत गोपनीय माहिती हिमालयातील या योगींशी शेअर केली.
  • तसेच एक्सचेंजच्या कर्मचार्‍यांच्या कामगिरीचे मूल्यांकनाबाबतही त्यांनी या योगींचा सल्ला घेतला असल्याचे सेबीच्या आदेशात सांगणायत आले आहे.
  • सेबीने रामकृष्ण आणि इतर काही आरोपींना दंडही ठोठावला आहे.
  • सेबीने रामकृष्ण यांना ३ कोटींचा दंड ठोठावला आहे.
  • सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीमध्ये संरक्षण कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • आनंद सुब्रमण्यन यांची समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) सल्लागार म्हणून नियुक्ती करताना संरक्षण कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या संदर्भात हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते आहे.

 

योगींच्या आदेशानुसार आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती!

  • नुकताच सेबीने राष्ट्रीय शेअर बाजाराबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
  • आनंद सुब्रमण्यम यांची एनएसईवर नियुक्ती एका ‘योगी’च्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे सेबीच्या अहवालात म्हटले आहे.
  • तर, सुब्रमण्यम यांना भांडवली बाजाराचा अनुभव नव्हता. एवढेच नाही तर त्यांचे वार्षिक पगार आणि भत्ते १५ लाखांचे पॅकेज ४ कोटींवर नेण्यात आले.

 

एनएसई हे देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज…

  • सेबीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनएसईचे माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी एनएसईशी संबंधित निर्णय एका योगींच्या सांगण्यावरून घेतले, ज्यांना कधी पाहिलेही नव्हते.
  • चित्रा रामकृष्ण यांच्यावर हिमालयात राहणाऱ्या एका योगींचा प्रभाव होता.
  • एनएसई हे देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे.
  • यामध्ये दररोज ४९ कोटींचे व्यवहार होतात.
  • एनएसई ची एक दिवसाची उलाढाल ६४ हजार कोटी आहे.

Tags: Chitra RamkrishnaNSEअज्ञात योगीएनएसईचित्रा रामकृष्ण
Previous Post

भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना आवाहन

Next Post

भूमिपुत्रांना खासगीत आरक्षण! सर्वोच्च न्यायालयाचा हरियाणाच्या ७५% आरक्षणाला हिरवा कंदिल!! महाराष्ट्र कायदा अंमलात आणणार?

Next Post
supreme court

भूमिपुत्रांना खासगीत आरक्षण! सर्वोच्च न्यायालयाचा हरियाणाच्या ७५% आरक्षणाला हिरवा कंदिल!! महाराष्ट्र कायदा अंमलात आणणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!