Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्याच्या राजकारणात ईडीकरण जोरात!

एकीकडे राऊतांच्या मागणीवर राज्याची ईडीविरोधी एसआयटी, दुसरीकडे राऊतांचा राहता फ्लॅट, जमिनीवर ईडीची जप्ती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay raut

मुक्तपीठ टीम

शिवसेना खासदार संजय राऊतांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यामध्ये अलिबागमधील भूखंड आणि दादरमधील त्यांचं कुटुंब राहतं त्या फ्लॅटचा समावेश आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या या कारवाईनंतर आता ठाकरेंचे डर्टी डझन आणि ठाकरे परिवारावरही कारवाई होणार असं म्हटलं आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीची ही कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली. संजय राऊतांचे मित्र प्रवीण राऊत याच प्रकरणात अटकेत आहेत. ईडीने कारवाई केली असली तरी संजय राऊत म्हणाले की मी बाळासाहेबांचे सैनिक आहोत या कारवाईमुळे आपण डगमगणार नाही. तसेच माझ्या मागणीनुसार राज्याने ईडीविरोधातील तक्रारींच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली त्याच दिवशी माझं राहतं घर आणि गावातील जमिनीवर जप्ती झाली त्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे.

 

संजय राऊतांवरील कारवाईमागे कारण काय?

  • मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली.
  • त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.
  • यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.
  • तसेच, संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

 

संजय राऊतांची प्रतिक्रिया!

  • मला कल्पना होती की, ईडी, सीबीआय माझ्यामागे लागली आहे.
  • सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता, मी त्यासंबंधित व्यंकय्या नायडू यांना पत्रही लिहिलं आहे.
  • त्यांना वाटत असेल की शिवसेना आणि संजय राऊत खचले असतील तर असं अजिबात नाही.
  • सूडाच्या कारवाया आणि असत्य कारवाया याचा पुढे आम्ही कधी गुडघे टेकणार नाही.
  • २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर.
  • हा राजकीय दबाव आहे.
  • एक रुपयाही अवैध मार्गानं जमा झाला असेल तर संपत्ती भाजपाा दान करून.
  • आम्हाला काही फरक पडत नाही, अशा कारवाया तुम्ही करत राहिल्या पाहिजेत.
  • महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की कशाप्रकारे सुरु आहे.
  • हा एकप्रकारचा सूड आहे.
  • इतक्या खालच्याप्रकारचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते.
  • हे राहतं घरं ज्याची चौकशी करण्यात आली, त्याची आमच्याकडे साधी विचारणा कुणी केली नाही.
  • ईडीला कितीही उड्या मारू देत, ते तोंडावर पडतील.

 

संजय राऊतांनंतर आता किरीट सोमय्यांचा पुढचा अजेंडा: “ठाकरेंचे डर्टी डझन!”

संजय राऊतांनंतर आता किरीट सोमय्यांचा पुढचा अजेंडा: “ठाकरेंचे डर्टी डझन!”

 

…तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! – संजय राऊत

…तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! – संजय राऊत

 


Tags: CBIEDsanjay rautShivsenaईडीपत्राचाळ घोटाळासंजय राऊतसीबीआय
Previous Post

टीव्ही रेटिंगचा फ्री डिश वाद: ‘झी २४ तास’सह झीच्या ९ न्यूज चॅनल्सचे रेटिंग रिपोर्टिंग थांबवण्याची प्रसार भारतीची मागणी!

Next Post

यूपीचा एक पती असाही…आजारी पत्नीला चार किमी दूर रुग्णालयात हातगाडीवरून नेले!

Next Post
Husband from UP took his sick wife to a hospital by handcart

यूपीचा एक पती असाही...आजारी पत्नीला चार किमी दूर रुग्णालयात हातगाडीवरून नेले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!