मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊतांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यामध्ये अलिबागमधील भूखंड आणि दादरमधील त्यांचं कुटुंब राहतं त्या फ्लॅटचा समावेश आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या या कारवाईनंतर आता ठाकरेंचे डर्टी डझन आणि ठाकरे परिवारावरही कारवाई होणार असं म्हटलं आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीची ही कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली. संजय राऊतांचे मित्र प्रवीण राऊत याच प्रकरणात अटकेत आहेत. ईडीने कारवाई केली असली तरी संजय राऊत म्हणाले की मी बाळासाहेबांचे सैनिक आहोत या कारवाईमुळे आपण डगमगणार नाही. तसेच माझ्या मागणीनुसार राज्याने ईडीविरोधातील तक्रारींच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली त्याच दिवशी माझं राहतं घर आणि गावातील जमिनीवर जप्ती झाली त्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे.
संजय राऊतांवरील कारवाईमागे कारण काय?
- मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली.
- त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.
- यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.
- तसेच, संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
संजय राऊतांची प्रतिक्रिया!
- मला कल्पना होती की, ईडी, सीबीआय माझ्यामागे लागली आहे.
- सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता, मी त्यासंबंधित व्यंकय्या नायडू यांना पत्रही लिहिलं आहे.
- त्यांना वाटत असेल की शिवसेना आणि संजय राऊत खचले असतील तर असं अजिबात नाही.
- सूडाच्या कारवाया आणि असत्य कारवाया याचा पुढे आम्ही कधी गुडघे टेकणार नाही.
- २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर.
- हा राजकीय दबाव आहे.
- एक रुपयाही अवैध मार्गानं जमा झाला असेल तर संपत्ती भाजपाा दान करून.
- आम्हाला काही फरक पडत नाही, अशा कारवाया तुम्ही करत राहिल्या पाहिजेत.
- महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की कशाप्रकारे सुरु आहे.
- हा एकप्रकारचा सूड आहे.
- इतक्या खालच्याप्रकारचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते.
- हे राहतं घरं ज्याची चौकशी करण्यात आली, त्याची आमच्याकडे साधी विचारणा कुणी केली नाही.
- ईडीला कितीही उड्या मारू देत, ते तोंडावर पडतील.
संजय राऊतांनंतर आता किरीट सोमय्यांचा पुढचा अजेंडा: “ठाकरेंचे डर्टी डझन!”
संजय राऊतांनंतर आता किरीट सोमय्यांचा पुढचा अजेंडा: “ठाकरेंचे डर्टी डझन!”
…तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! – संजय राऊत