Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांवर सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माध्यमातून दबाव?

उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात राऊतांचा आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut (2)

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई केली जात आहे. त्यानंतर राऊत यांनी थेट उपराष्ट्रमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी पत्राचा फोटो ट्विटरवर शेअर करत ‘सत्यमेव जयते’ म्हटलं आहे.

 

नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी…

  • संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करताना म्हटले की, राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली.
  • सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील.
  • मात्र, मी याला नकार दिला.
  • माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती.
  • माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली.
  • त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात असेही राऊत यांनी म्हटले.

 

सत्यमेव जयते.. pic.twitter.com/ImdX7wPuYa

— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2022

ईडी वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी देते…

  • अलिबागमध्ये राऊत यांची एक एकर जमीन आहे.
  • ही जमिन १७ वर्षांपूर्वी खरेदी केली होती.
  • ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली, त्यांच्या कुटुंबीयांना ईडीकडून त्रास दिला जात आहे.
  • जमीन व्यवहारासाठी कागदपत्रांसाठी नमूद असलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम मिळाली अशी कबुली द्यावी यासाठी ईडीकडून त्यांना धमकी दिली जात आहे.
  • २०१२-१३ मध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला अशीच छोटी जमीन विकणाऱ्या इतर लोकांसोबतही हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
  • दिवसेंदिवस ईडी आणि इतर एजन्सींचे कर्मचारी या लोकांना फोन करतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी देतात.

 

२८ जण बेकायदेशीरपणे ताब्यात

  • तपास यंत्रणांनी आतापर्यंत २८ जणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहे.
  • या लोकांनी तपास यंत्रणांना अनुकूल असा जबाब द्यावा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे.

 

मुलीच्या लग्नाच्या खर्चाची चौकशी…

  • मुलीच्या लग्नात डेकोरेशनचं काम केलेल्या लोकांना ५० लाख रोख मिळाल्याचा जबाब घेण्यासाठी फोन करून धमकावत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
  • पीएमएले प्रकरणात मला फसवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे.
  • आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि परिचित यांना धमकावण्यास आणि त्यांचा छळ करण्यात येत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे.

Tags: EDsanjay rautvenkaiah naiduईडीउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंसंजय राऊत
Previous Post

“शाश्वत विकास, मानवधर्म आणि वसुंधरेसाठी सोबत काम करूया” – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Next Post

“गुजरातमध्ये कोरोना मृत्यू १०हजार, मदत मात्र ८२ हजारांना! एक लाखावर अर्ज!”

Next Post
Gujarat CM And Vijay wadettiwar

"गुजरातमध्ये कोरोना मृत्यू १०हजार, मदत मात्र ८२ हजारांना! एक लाखावर अर्ज!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!