Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शाश्वत विकास, मानवधर्म आणि वसुंधरेसाठी सोबत काम करूया” – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारातून मंथन परिषदेचे आयोजन

February 9, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Manthan Parishad for Sustainable Development

मुक्तपीठ टीम

संपूर्ण जग हे वातावरणीय बदलाच्या परिणामांशी लढा देत आहे. आपणही शासन, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक मिळून सोबत काम करूया, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

            

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क आणि स्त्री आधार केंद्रामार्फत आयोजित हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे याबाबत जागृती निर्माण करणाऱ्या ‘मंथन’ या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांनी केले. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, संपर्क आणि स्त्री आधार केंद्राचे विश्वत आणि सदस्य, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.

            

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, विधीमंडळ सभागृहातील चर्चेपासून गावपातळीपर्यंत वातावरणीय बदलाबाबत मंथन होऊ लागले आहे, ही अत्यावश्यक आणि सकारात्मक बाब आहे. वातावरणीय बदल स्वीकारून ते रोखण्यासाठी उपाययोजना करताना लोकसहभाग अतिशय गरजेचा आहे. माझी वसुंधरा अभियान राबविताना याचा अनुभव येत असून गावपातळीपर्यंत प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने युनिसेफसोबत शालेय अभ्यासक्रमासाठी तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत वातावरणीय बदलाबाबत काम करण्यासाठी करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन लहान लहान पर्यावरणपूरक सवयींचा अंगिकार केल्यास हे बदल रोखण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र हे अनेक क्षेत्रात देशात आघाडीवरचे राज्य आहे. तथापि ज्या क्षेत्रात अजूनही आपल्याला चांगले काम करायचे आहे त्याबाबत राज्याने निती आयोगासारख्या केंद्रीय संस्थांसमोर आपले काम दाखवून देण्याची आवश्यकता आहे. वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होत असलेले काम कौतुकास्पद आहे. यात सखोल काम होण्याच्या दृष्टीने पाणी, हवा, शेती, घनकचरा अशा विविध क्षेत्रातील समस्या आणि उपाययोजना जाणून घेण्यासाठी आयोजित ‘मंथन’ परिषदेत तज्ज्ञांसोबत चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वातावरणीय बदलांबाबत विधीमंडळ सभागृहाबरोबरच गावपातळीवरही मंथन होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.

            

ही परिषद दोन दिवस चालणार असून यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांची सांगड घालून कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने मंथन करणार आहेत.

            

यानंतर दुसऱ्या सत्रात दिल्ली येथील परवी संस्थेचे अजय झा यांनी जग, भारत आणि महाराष्ट्र : हवामान बदल आणि शाश्वस्त विकास उद्दिष्टे यांची सांगड याबाबत मांडणी केली. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात हवामान बदल आणि शाश्वत विकास उद्दिष्टे यावरील कामाची गरज याबाबत अमिताव मलिक, प्रशांत गिरबाने यांनी मत व्यक्त केले. त्याचबरोबर शाश्वस्त विकासाची उद्दिष्टे ऊर्जा आणि हवेची गुणवत्ता यावर प्रियदर्शिनी कर्वे, शिरीष फडतरे तर जमीन, पोषण आणि शेती – दिलीप गोडे, रमेश भिसे त्याचबरोबर पाणी याविषयावर अभिजीत घोरपडे, आरोग्यवर डॉ.संदीप साळवी, शिक्षण संदर्भात संस्कृती मेनन, नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती या विषयावर अरुण शिवकर तर महिला आणि हवामानबदल यासंदर्भात स्त्री आधार संस्थेच्या अपर्णा पाठक आणि विभावारी कांबळे यांनी मांडणी केली. परिषदेत वक्त्यांचे स्वागत सचिव रवींद्र खेबुडकर तर पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन ‘संपर्क’च्या मेधा कुळकर्णी यांनी केले. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन मृणालिनी जोग यांनी केले.

            

या परिषदेच्या ०९ फेब्रुवारी रोजीच्या सत्रात नागरिकांचा कृती कार्यक्रम या अंतर्गत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, कृषी सचिव एकनाथ डवले, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव हे हवामानबदल आणि विकासाची शाश्वत उद्दिष्टे गाठण्यासाठी केलेले प्रयत्न विविध शासकीय विभागांची मांडणी याबाबत विचार मांडणार आहेत.


Tags: aditya thackerayDr.Neelam GorheManthan Parishadsustainable developmentआदित्य ठाकरेडॉ.नीलम गोऱ्हेमंथन परिषदशाश्वत विकास
Previous Post

डेन्मार्क, कोरोना आणि राजकारण देश छोटा .. संदेश मोठा !

Next Post

संजय राऊतांवर सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माध्यमातून दबाव?

Next Post
sanjay raut (2)

संजय राऊतांवर सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माध्यमातून दबाव?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!