मुक्तपीठ टीम
विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन सॅमसंगने स्टुडंट अॅडव्हान्टेज प्रोग्राम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या नवीन स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि स्मार्टवॉचवर हजारो रुपयांची बचत करू शकतात. सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर, सॅमसंग शॉप आणि सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअरवरून विद्यार्थी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
- सॅमसंग स्टुडंट अॅडव्हांटेज प्रोग्राम या ऑफरनुसार, तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुम्ही सॅमसंगची फ्लॅगशिप सीरीज आणि गॅलेक्सी ए सीरीजची डिवाईस ५ टक्के सूट देऊन खरेदी करू शकता.
- कंपनी गॅलेक्सी एस२२ अल्ट्रा, गॅलेक्सी एस२२+, गॅलेक्सी एस२२, गॅलेक्सी एस२० एफई आणि गॅलेक्सी एस२१ एफई, गॅलेक्सी ए७३ ५जी, गॅलेक्सी ए५३ ५जी, गॅलेक्सी ए३३ ५जी, गॅलेक्सी ए२३ आणि गॅलेक्सी १३ वर सूट देत आहे.
- या ऑफरचा फायदा घेत विद्यार्थी गॅलेक्सी एस२२ सह सॅमसंग व्हॉच ४ फक्त २,९९९ रुपयांना आणि सॅमसंग गॅलेक्सी बड्ससह सॅमसंग एस२२+ २,९९९ रुपयांना विकत घेऊ शकतात.
- कंपनी ८,००० रुपयापर्यंतचा अपग्रेड बोनस देखील देत आहे.
- सॅमसंगकडून वित्तपुरवठा केल्यावर कंपनी शून्य डाउन पेमेंटसह २४ महिन्यांची विना-खर्च EMI ऑफर देखील देत आहे.
- एच डी एफ शी बँके कार्ड वर ५,००० रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे.
- सॅमसंग ए सिरीज स्मार्टफोन्सवर विद्यार्थ्यांना रु. ३,००० चा अतिरिक्त कॅशबॅक देखील देत आहे.
- सॅमसंगच्या या ऑफरसह, कंपनी गॅलेक्सी टॅब एस८ आणि गॅलेक्सी टॅब ए८ वर ५ टक्के सूट देत आहे.
- सॅमसंगच्या गेमिंग मॉनिटर जी५ सीरीज, जी७ सीरीज, जी९ सीरीज, वक्र फुल एचडी मॉनिटर सीएफ३९ सीरीजच्या खरेदीवर ५ टक्के सूट आहे.
- सॅमसंग २०२२मध्ये लाँच केलेल्या सर्व नवीन लॅपटॉप सीरिजवर १० टक्के सूट देत आहे.
- गॅलेक्सी बुक गो, गॅलेक्सी बुक २, गॅलेक्सी बुक २ ३६०, गॅलेक्सी बुक २ प्रो आणि गॅलेक्सी बुक प्रो ३६० यांचा समावेश आहे.
- सॅमसंगच्या स्टुडंट अॅडव्हान्टेज प्रोग्रामचा लाभ घेऊन तुम्ही स्मार्ट वेअरेबल देखील खरेदी करू शकता.
- सॅमसंग गॅलेक्सी व्हॉच ४ आणि सॅमसंग बड्स प्रो टी डब्लू एसच्या खरेदीवर १० टक्के सूट आहे.