मुक्तपीठ टीम
सॅमसंगने गॅलेक्सी एम३२ ५जी या एम सीरीजचा नवीन ५जी स्मार्टफोनला भारतामध्ये लॉन्च केले आहे. हा कंपनीचा सर्वात पॉवरफुल मिड-रेंज ५जी स्मार्टफोन आहे. या नव्या सॅमसंग गॅलेक्सीमध्ये १२ ५जी ब्रँड्स दिले आहेत. दोन कलर ऑप्शन स्लॉट ब्लॅक आणि स्काय ब्ल्यू मध्ये हा स्मार्ट फोन येतो.
वाजवी किंमत आणि चांगल्या ऑफर्स
- सॅमसंग गॅलेक्सी एम३२ ५जी स्मार्टफोनला ६जीबी+ १२८जीबी आणि ८जीबी + १२८जीबी स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केले आहे.
- या फोनची सुरुवातीची किंमत १८,९९९ रुपये आहे.
- फोनच्या विक्रीला २ सप्टेंबर दुपारी १२ वाजता सुरुवात होईल.
- फोनला आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड वर खरेदी केल्यानंतर २,००० रुपये सूट मिळेल.
- सोबतच या मोबाईलला ईएमआयवरही खरेदी केले जाऊ शकते.
जबरदस्त फिचर्स!
- सॅमसंग गॅलेक्सी एम३२ ५जी स्मार्टफोन मध्ये ६.५ इंचची एचडी+ इन्फिनिटी – व्ही डिस्प्ले मिळेल.
- फोन प्रीमियम आणि स्लीक डिजाइन मध्ये येतो.
- यात १टीबी एक्स्पँडेबल स्टोरेज सपोर्ट दिला आहे.
- फोनमध्ये डीमेंसिटी ७२० प्रोसेसर सपोर्ट दिला आहे.
- फोन अँड्रॉइड ११ बेस्ड वन यूआय ३.१ वर काम करेल.
- पॉवर बॅकअप साठी गॅलेक्सी एम३२ ५जी स्मार्टफोन मध्ये ५००० एमएएच ची बॅटरी दिली आहे.
- त्याला १५डब्ल्यू फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.
एम३२चा १२० डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेंस कॅमेरा
- गॅलेक्सी एम३२ ५जी स्मार्टफोन मध्ये ४८एमपी क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे.
- या व्यतिरिक्त ८एमपी १२० डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेंस, ५एमपी मायक्रो लेंस आणि २एमपी लाईव्ह फोकसचा सपोर्ट दिला आहे.
- फ्रंटमध्ये सेल्फीसाठी १३एमपी चा कॅमेरा दिला आहे.
पाहा व्हिडीओ: