Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय वंशाचे अनेक शास्त्रज्ञ परदेशातून भारतात परतण्यास उत्सुक! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती!

February 28, 2022
in घडलं-बिघडलं
0
Indian origin Scientists abroad keen to return home

मुक्तपीठ टीम

परदेशात असलेले भारतीय वंशाचे अनेक शास्त्रज्ञ सध्या मायदेशी परतण्यासाठी उत्सुक असल्याने सध्या भारताला रिव्हर्स ब्रेन ड्रेन प्रक्रियेचा अनुभव येत आहे आणि याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या पोषक वातावरणाला दिले पाहिजे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण, पेन्शन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. ते आज हरयाणामध्ये फरिदाबाद येथे प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या ३६व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते.

indian scientists eager to return to india from abroad

यावेळी सिंह यांनी “सुलभ विज्ञान अवलंबः किमान सरकार कमाल शासनाच्या दिशेने” यासाठी नवे मार्गदर्शक नियम देखील जारी केले आणि रामलिंगस्वामी रि- एन्ट्री फेलोशिप परिसंवादाचे उद्घाटन करताना रामलिंगस्वामी रि-एन्ट्री फेलोजसाठी एका डिरेक्टरीचे प्रकाशन केले. परदेशात काम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांना पुन्हा मायदेशी आणण्याच्या उद्देशाने रामलिंगस्वामी रि- एन्ट्री फेलोशिप ही २००६-०७ मध्ये सुरू केलेली एक प्रतिष्ठेची योजना आहे.

Indian origin Scientists abroad keen to return home

३६ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. जितेंद्र सिंह यांनी जैवतंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले. गेल्या 36 वर्षात या विभागाने देशभरात जैवतंत्रज्ञान संशोधन आणि विकास, शिक्षण आणि नवोन्मेषावर मोठा प्रभाव निर्माण केला आहे, असे ते म्हणाले.

 

जैवतंत्रज्ञान विभागाने कोविड या संकटाचा वापर जगाला आपली क्षमता दाखवून देण्यासाठी केला, असे त्यांनी नमूद केले. जैवतंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंचा विकास करण्यामध्ये आणि भावी काळात येऊ घातलेल्या जैवतंत्रज्ञानासाठी या विभागाने मोठे योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

 

यावेळी माउंट एव्हरेस्ट दोन वेळा सर करणाऱ्या पहिल्या महिला पद्मा संतोष यादव यांनी जैवतंत्रज्ञान विभाग वर्धापनदिन व्याख्यान दिले आणि उपस्थित शास्त्रज्ञ आणि सहकाऱ्यांना आपले गिर्यारोहणाचे अनुभव सांगितले.


Tags: Indian ScientistsJitendra singhकेंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
Previous Post

रशिया X युक्रेन युद्ध: समजून घ्या संघर्षाचा इतिहास, नाटो आणि रशियाचा विरोध…

Next Post

एकच रण, मराठा आरक्षण: उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे छत्रपतींच्या प्रकृतीवर परिणाम

Next Post
SambhajiRaje Chhatrpati

एकच रण, मराठा आरक्षण: उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे छत्रपतींच्या प्रकृतीवर परिणाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!