Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बैठक: स्वीकाहार्यता वाढवून विस्तारासाठी नव्यानं ‘जात-पात तोडा’ अभियान

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rss decides to start anti cast movement to increase acceptance

मुक्तपीठ टीम

सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारकांची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संघाची देशातील सर्वच भागांमध्ये आणि वर्गांमध्ये स्वीकाहार्यता वाढवण्यावर विचारमंथन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न नको, असे काही दिवसांपूर्वी बजावलं होतं. त्यामुळे संघ वाद आणि गदारोळापेक्षा सकारात्मक कामांमधून विस्ताराच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्यानं ‘जात-पात तोडा’ अभियान राबवणार आहे.

राजस्थानमधील झुंझुनू येथे सुरू झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील प्रांत प्रचारकांच्या बैठकीत देशात जातीय सलोखा राखण्यावर गंभीर विचारमंथन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्यानं राबवणार ‘जात-पात तोडा’ अभियान करणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीत संघ प्रमुखांसह संघाशी संलग्न सर्व संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झालेत.

बैठकीत काय ठरले?

  • बैठकीच्या दुसऱ्या दिवशी विविध सत्रांमध्ये संघाचा विस्तार, जातीय सलोखा आणि शताब्दी वर्षाची तयारी यावर चर्चा झाली.
  • यामध्ये विशेषत: हिंदू समाजातील व्यापक एकतेवर भर देत जातीविरोधी मोहीम नव्याने सुरू करण्याचे मान्य करण्यात आले.
    २०१५ मध्ये सुरू झालेली एक विहीर, एक मंदिर, एक स्मशान या मोहिमेची नव्याने आणि नव्या रणनीतीने सुरुवात करावी, असे ठरले.

संघाच्या शाखा वाढवण्याचा निर्णय!!

  • संघाची स्वीकाहार्यता आणि प्रसार वाढविण्यावरही विशेष चर्चा झाली.
  • यावेळी सध्या सुरू असलेल्या शाखांच्या संदर्भात सादर केलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली.
  • कोरोना महामारीनंतर संघाच्या शाखा पूर्वीप्रमाणेच सुरू झाल्या आहेत.
  • त्याची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता घरोघरी संपर्क मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.
  • या मोहिमेंतर्गत लोकांशी विशेषत: सामाजिक, धार्मिक आणि देशाशी निगडित प्रश्नांवर थेट संवाद व्हायला हवा.
  • राष्ट्रीय मुस्लिम मंच उदयपूर आणि अमरावती येथील हत्यासंदर्भात देशातील निवडक ठिकाणी शोक सभा आयोजित करणार आहे.
  • या सभांना सर्व धर्माच्या लोकांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

Tags: RajasthanRashtriya SwayamSevak SangRashtriya Swayamsevak Sanghrssजात-पात तोडाप्रांत प्रचारक बैठकराजस्थानराष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Previous Post

ट्विटरमध्ये नोकर कपात: एचआर टीममधील ३०% कर्मचाऱ्यांना काढले!

Next Post

मानवाधिकारवाल्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनलवर का ईडीची कारवाई? समजून घ्या प्रकरण…

Next Post
why action against Amnesty International

मानवाधिकारवाल्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनलवर का ईडीची कारवाई? समजून घ्या प्रकरण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!