मुक्तपीठ टीम
सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारकांची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संघाची देशातील सर्वच भागांमध्ये आणि वर्गांमध्ये स्वीकाहार्यता वाढवण्यावर विचारमंथन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न नको, असे काही दिवसांपूर्वी बजावलं होतं. त्यामुळे संघ वाद आणि गदारोळापेक्षा सकारात्मक कामांमधून विस्ताराच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्यानं ‘जात-पात तोडा’ अभियान राबवणार आहे.
राजस्थानमधील झुंझुनू येथे सुरू झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील प्रांत प्रचारकांच्या बैठकीत देशात जातीय सलोखा राखण्यावर गंभीर विचारमंथन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्यानं राबवणार ‘जात-पात तोडा’ अभियान करणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीत संघ प्रमुखांसह संघाशी संलग्न सर्व संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झालेत.
बैठकीत काय ठरले?
- बैठकीच्या दुसऱ्या दिवशी विविध सत्रांमध्ये संघाचा विस्तार, जातीय सलोखा आणि शताब्दी वर्षाची तयारी यावर चर्चा झाली.
- यामध्ये विशेषत: हिंदू समाजातील व्यापक एकतेवर भर देत जातीविरोधी मोहीम नव्याने सुरू करण्याचे मान्य करण्यात आले.
२०१५ मध्ये सुरू झालेली एक विहीर, एक मंदिर, एक स्मशान या मोहिमेची नव्याने आणि नव्या रणनीतीने सुरुवात करावी, असे ठरले.
संघाच्या शाखा वाढवण्याचा निर्णय!!
- संघाची स्वीकाहार्यता आणि प्रसार वाढविण्यावरही विशेष चर्चा झाली.
- यावेळी सध्या सुरू असलेल्या शाखांच्या संदर्भात सादर केलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली.
- कोरोना महामारीनंतर संघाच्या शाखा पूर्वीप्रमाणेच सुरू झाल्या आहेत.
- त्याची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता घरोघरी संपर्क मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.
- या मोहिमेंतर्गत लोकांशी विशेषत: सामाजिक, धार्मिक आणि देशाशी निगडित प्रश्नांवर थेट संवाद व्हायला हवा.
- राष्ट्रीय मुस्लिम मंच उदयपूर आणि अमरावती येथील हत्यासंदर्भात देशातील निवडक ठिकाणी शोक सभा आयोजित करणार आहे.
- या सभांना सर्व धर्माच्या लोकांना आमंत्रित करण्यात येणार आहे.