Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील ‘सीप्झ’चे नुतनीकरण आणि पुनर्बांधणीवर २०० कोटी रुपये खर्च करणार!

वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची घोषणा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
speez

मुक्तपीठ टीम

सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्रातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या कंपन्यांना कालबद्ध पद्धतीने बाहेर पडण्यासाठी आणि नवीन कंपन्यांना त्यांचे स्थान घेण्यास सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार धोरण आखत आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. तसेच ‘सीप्झ’च्या नूतनीकरण आणि पुनर्बांधणीवर २०० कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

 

निर्यात वाढवण्याच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत निर्यात प्रोत्साहन परिषद, कमोडिटी बोर्ड आणि प्राधिकरण आणि इतर हितधारकांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी हे नमूद केले.

सीप्झच्या विकास आयुक्तांना उद्योग क्षेत्राशी सल्लामसलत करून अत्यंत स्पर्धात्मक दरात सेवा प्रदान करण्यासाठी एक सामायिक सेवा केंद्र स्थापन करण्यास सांगितले आहे असे गोयल म्हणाले. “सीप्झमध्ये नव्याने सहभागी होणाऱ्या कंपन्यांसाठी तसेच विद्यमान कंपन्यांना नवीन ठिकाणी हलवण्यासाठी, नवीन ठिकाणे तयार करण्यास सांगितले असून यासाठी टप्प्याटप्प्याने योजना आखली जाईल . सामायिक सेवा केंद्र सुविधा उभारण्यासाठी ५० कोटी आणि सीप्झच्या नूतनीकरण आणि पुनर्बांधणीवर अंदाजे २०० कोटी रुपये खर्च केले जातील. “

 

सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (SEEPZ) ची स्थापना १ मे १९७३ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती आणि निर्यातीसाठी युनि-प्रॉडक्ट EPZ म्हणून करण्यात आली. नंतर,केंद्र सरकारने १९८७-८८ दरम्यान सीप्झ मधून रत्न आणि दागिन्यांच्या वस्तूंच्या निर्मिती आणि निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. विविध प्रकारची नियंत्रणे आणि मंजुरी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा अभाव, आणि अस्थिर वित्तीय व्यवस्था यामुळे निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने; आणि भारतात मोठ्या परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी एप्रिल २००० मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (SEZs) धोरण जाहीर करण्यात आले. SEEPZ हे तीन निर्यात प्रक्रिया क्षेत्रांपैकी एक होते जे १ नोव्हेंबर २००० पासून विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून रूपांतरित करण्यात आले.

 

भारतीय तेलबिया आणि उत्पादने निर्यात प्रोत्साहन परिषद (आयओपीईपीसी), ईईपीसी इंडिया, प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषद (प्लेक्सकॉन्सिल), सेवा निर्यात प्रोत्साहन परिषद, सिंथेटिक अँड रेयॉन टेक्स्टाईल निर्यात प्रोत्साहन परिषद, यंत्रमाग विकास आणि निर्यात प्रोत्साहन परिषद, टेक्स्प्रोसिल, जेम अँड ज्वेलरी निर्यात प्रोत्साहन परिषद, ऍपारेल निर्यात प्रोत्साहन परिषद, सीआयआय, एफआयईओ( फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशन), प्रोजेक्ट एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सील ऑफ इंडिया आणि इतरांसह या बैठकीमध्ये निर्यात प्रोत्साहन परिषद, कमोडिटी बोर्ड आणि अधिकारी उपस्थित होते. निर्यात प्रोत्साहन परिषदा आणि इतर सहभागी मुंबईत प्रत्यक्ष उपस्थित होते तर इतर विविध ठिकाणांहून इतर सहभागी ऑनलाईन माध्यमांद्वारे उपस्थित होते.


Tags: Andherimumbaipiyush goyalSEEPZ
Previous Post

शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांच्या संरक्षणाचे तंत्रज्ञान!

Next Post

महामेट्रोचे झिरो माईल स्टेशन आणि फ्रिडम पार्क नागपूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या वास्तू

Next Post
nagpur

महामेट्रोचे झिरो माईल स्टेशन आणि फ्रिडम पार्क नागपूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या वास्तू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!